भूमिपुत्राने बनविले जुगाड टोकण पेरणी यंत्र

Описание к видео भूमिपुत्राने बनविले जुगाड टोकण पेरणी यंत्र

नवीन यंत्र निर्मितीचा ध्यास, तांत्रिक कौशल्य व अचाट कल्पनाशक्तीचा सुयोग वापर करीत मेहकर तालुक्यातील लोणी येथील अल्पभूधारक सतिष मधुकर देशमुख या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांने बहुउद्देशीय टोकन यंत्राची निर्मिती केली आहे. या टोकन पेरणी यंत्राव्दारे उडीद, मूग, तूर, सोयाबीन, हरभरा, गहू, कांदा कपाशी व तीळाची पेरणी केवळ एका मजूराच्या मदतीने सहज करता येते. सतिष मधुकर देशमुख यांच्याकडे वडीलोपार्जित पाच एकर शेती आहे. शेतातील सोयाबीन पिकाचे उत्‍पादन वाढीसाठी गेल्या अनेक वर्षापासून ते सोयाबीन मजूरांच्या मदतीने पेरणी करीत होते. त्‍यांना एका एकर सोयाबीन पेरणीसाठी १० मजूर लागत असते. एका एकराच्या सोयाबीन पेरणीसाठी दीड हजार मजूरी लागत असल्यामुळे त्‍यांना टोकन यंत्र पेरणी तयार करण्याची कल्पना सुचली. टोकन पेरणी यंत्राच्या मदतीने वेळ, श्रम व मजूरीबळ कसे कमी करता येईल यावर त्‍यांनी विचारमंथन सुरू केले. त्‍यातून सतिष देशमुख यांना बहुउद्देशीय टोकन यंत्र निर्मितीची कल्पना सुचली. या बहुउद्देशीय टोकन यंत्र बैलचलीत असल्यामुळे एका व्यक्तीच्या मदतीने पेरणी करता येते. यामुळे मजूरांची, वेळेची व बियाण्यांची मोठया प्रमाणात बचत होते. या टोकण यंत्रामुळे एका एकरासाठी केवळ १० किलो बियाणे लागते. पारंपारीक पध्दतीने सोयाबीन पेरणी केल्यास एका एकारासाठी ३० किलो बियाणे लागते. एका एकरासाठी पेरणी दहा मजूरा ऐवजी केवळ एक मजूर या टोकन यंत्राव्दारे पेरणी करू शकतो. या टोकन यंत्र निर्मितीमुळे सतिष मधुकर देशमुख यांच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

संतोष थोरहाते
मुख्य संपादक,हिवरा आश्रम अपडेट
मो.9923209658

Комментарии

Информация по комментариям в разработке