द्राक्ष बागेत अन्नद्रव्ये कमतरता

Описание к видео द्राक्ष बागेत अन्नद्रव्ये कमतरता

नमस्कार. !
द्राक्ष बागायतदार मित्रांनो. !!
आजचा व्हिडिओ मध्ये आपण
१)द्राक्षबागेत मुख्य अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास काय परिणाम होतो?
२) अन्नद्रव्यांची बागेत कमतरता आहे हे कसे ओळखावे?
३) अन्नद्रव्यांचा आपल्या बागेत काय फायदा होतो?
अशा अनेक विषयांवर माहिती घेणार आहोत.
✓ अन्नद्रव्यांचे प्रकार:-
१) मुख्य अन्नद्रव्य :- मुख्य अन्नद्रव्यांमध्ये नत्र,स्फुरद,पालाश असे तीन घटक येतात.(NPK)
२) दुय्यम अन्नद्रव्य :-दुय्यम अन्नद्रव्य मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम,गंधक हे घटक असतात.
३) सूक्ष्म अन्नद्रव्य:-जस्त, लोह, तांबे ,बोरॉन. मोलेबेडीनिअम हे घटक येतात.
✓१) मुख्य अन्नद्रव्यांमध्ये नत्र
नत्राची कमतरता कशी ओळखावी?
1] झाडाची खालची पाने पिवळी पडतात.
2] मुळाची व फांद्यांची वाढ खुंटते.
3] फळे कमी लागतात.
✓ नत्राचे फायदे:-
नत्र पिकाच्या वाढीसाठी काम करते.
-पानांमध्ये हरित लवकांची निर्मिती करते
-हरित लवकांमुळे बागेचा हिरवेगार पना कायम राहतो.
कोणतेही नत्र खतं मार्फत दिल्यानंतर 48 तासात पिकाला मिळायला सुरुवात होते.
✓२) स्फुरदाची कमतरता कशी ओळखावी?
पाने हिरवट व लांबट होऊन त्यांची वाढ खुंटते.
-पानांच्या मागच्या बाजूला जांभळा कलर येतो.
-पांढऱ्या मुळ्यांची वाढ होत नाही.
कोणत्याही खतामार्फत स्फुरद दिले तर हे 10 दिवसानंतरच लागू व्हायला सुरवात होते. काही खतान मधले तीस ते पस्तीस दिवसांच्या नंतर मिळायला सुरुवात होते.
✓३) पालाशची कमतरता कशी ओळखावी?
-पानांवर तांबडे आणि पिवळे ठिपके पडतात.
-शेंडा जळू लागतो.
-द्राक्ष वेलीची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते.
पालाश चे फायदे:-
-फळांचा आकार व गुणवत्ता वाढीसाठी मदत होते.
-पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
पालाश आपल्या पिकाला दिल्यानंतर 35 ते 40 दिवसानंतरच पिकाला मिळायला सुरुवात होते.

✓ दुय्यम अन्नद्रव्य:- कॅल्शियम ची कमतरता
जर आपल्या बागेमध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर पाने टोकाकडून देठा कडे पिवळी पडत जातात. पानांच्या शिरा पिवळ्या होतात.
✓ मॅग्नेशियमची कमतरता
पाने पिवळी पडतात, मॅग्नेशियमची जास्तच कमतरता असेल तर पाने वाळून जातात कालांतराने पानांचा कलर राखाडी रंगाचा होतो.
✓गंधकाची कमतरता
जर बागेत गंधकाची कमतरता असेल तर पानांचा जो मूळ हिरवा रंग असतो तो कमी होतो कालांतराने पाने पिवळी व पांढरी पडतात. अशी लक्षणे दिसल्यास आपल्या बागेची गंधकाची कमतरता आहे हे समजून जावे.
✓जास्त ची कमतरता
जर आपल्या बागेमध्ये जास्त ची कमतरता असेल तर पानांची साईज बारीक होते पानांच्या शिरा पिवळ्या पडू लागतात शेंड्याची वाढ खुंटते.
✓ बोरॉन ची कमतरता
जर आपल्या बागेत बोरांची कमतरता असेल तर शेंड्याकडील जी पाने असतात नवीन पालवी फुटलेली असते तिचा रंग फिकट होतो जी नवीन पालवी फुटलेली असते तिची पाने आकसली जातात.
april chatni niyojan
एप्रिल छाटणी नियोजन
खरड छाटणी
द्राक्ष बाग माहिती
Grapes farming
Grapes cultivation
Grapes cultivation in India
द्राक्ष बागेविषयी नवीन व्हिडीओ बघण्यासाठी #maheshvgaikwad या YouTube चॅनलला सबसक्राईब करा.
Follow me on
Instagram:-   / maheshvgaikwad1  
Facebook:- https://m.facebook.com/groups/2595901...
Sharechat :- https://b.sharechat.com/kTL7tP4ffR
What's app :-https://chat.whatsapp.com/IabOYg7XBpS...
NOTE:-ALL THE IMAGE /PICTURES SHOWN IN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNER AND NOT ME
Copyright Disclaimer-
Video is for educational purposes only copyright disclaimer under section 107 of the copyright Act 1976, Allowance is made for"fair use"for purposes such as criticism comment news reporting teaching scholarship and research fair use is use permitted by copyright statute that might otherwise be infringing non profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.

Комментарии

Информация по комментариям в разработке