हरिपाठ ४ : भावेविण भक्ती

Описание к видео हरिपाठ ४ : भावेविण भक्ती

भावेविण भक्ती । भक्तीविण मुक्ती ॥

भजनाचार्य वै . मनोहरपंत तथा दादा सबनीस यांच्या जन्मशताब्दी वर्षांतील हे ४० वे पुष्प -

हरिपाठ अभंग ४
राग बागेश्री
रचना : श्री ज्ञानेश्वर महाराज
संगीत व गायन : वै . मनोहरपंत तथा दादा सबनीस
निरूपण : मिलिंद प्रभाकर सबनीस
संकलन : सौमित्र मिलिंद सबनीस
ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाच्या अठ्ठावीस अभंगांना वै . दादांनी केलेल्या संगीत रचना या दादांच्या सर्वोत्कृष्ट संगीतरचनांपैकी एक आहे . ज्ञानेश्वर माउलींनी भक्ती आणि त्यामागे असणाऱ्या भावाचे महात्म्य या अभंगात सांगितले आहे . त्याचबरोबर हरीनामाच्या जपाचं महत्त्व त्यांनी स्पष्टपणे अधोरेखीत केले आहे . अत्यंत साधी सोपी तरीही मोठा आशय असणारी शब्दरचना आणि बागेश्री सारख्या परिचित रागाची केलेली मांडणी हे हरिपाठातील या अभंगाचे वैशिष्ट्य .
हे सर्व अभंग आपण एका पाठोपाठ ऐकूया .

अभंग क्र . ४

Комментарии

Информация по комментариям в разработке