वालीची / चवळीच्या शेंगांची भाजी कोकणी style | डब्बा/tifin recipe | Chavali shenga Bhaji@KokaniThhat

Описание к видео वालीची / चवळीच्या शेंगांची भाजी कोकणी style | डब्बा/tifin recipe | Chavali shenga Bhaji@KokaniThhat

वालीच्या किंवा चवळीच्या शेंगांची भाजी :
साहित्य :
१ जुडी चवळी शेंगा कोवळ्या
५-६ लसूण पाकळ्या ठेचून
कडीपत्ता
१ मोठा कांदा बारीक चिरून
१ मोठा पिकलेला टोमॅटो बारीक चिरून
अर्धा छोटा चमचा हळद चवीप्रमाणे लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला
गरम मसाला १ छोटा चमचा
( आवश्यक वाटल्यास चिकन मसाला किंवा पाव भाजी मसाला )
कोकम १-२
मीठ चवीनुसार
तेल फोडणीसाठी
पाणी अगदी लागले तर
ओले खोबरे खोवून १-२ चमचे

घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून ही भाजी खूप सुंदर होते चवीला. साधी वाटली आणि सोपी recipe असली तरी त्यामुळे भाजीला चव खूप छान येते.

माझ्या या Kokani Thhat या youtube channel वर अगदी कमी वेळात, रोज घरी केल्या जाऊ शकतात आणि शरीराला पौष्टिक अशा रेसिपीज मी दाखवते. खुप वेळेला पारंपरिक आणि त्याला सुद्धा नाविन्याचा थोडासा मुलामा देऊन मुख्य चवीला धक्का न लावता रेसिपीज तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा माझा कायम प्रयत्न राहील. तरी आपण या चॅनल ला subscribe करून पुढील वाटचालीस आशीर्वाद आणि शुभेच्छा द्याव्यात ही विनंती 🙏🏻 .

#वालीची_भाजी
#चवळीच्या_शेंगांची_भाजी
#vaalichi_bhaji
#chavali_shenga_bhaji
#easy_tifin_recipe
#Kokani_recipe
#traditional_recipe

Комментарии

Информация по комментариям в разработке