🌴कोकणातील जाखडी नृत्य//कोकणातील लोक कला शक्ती तुरा😍kumbhave Dapoli Ratnagiri

Описание к видео 🌴कोकणातील जाखडी नृत्य//कोकणातील लोक कला शक्ती तुरा😍kumbhave Dapoli Ratnagiri

#कोकणातील_लोक_कला_शक्ती_तुरा
#kumbhave_Nimbarvadi
#कोकणातील_जाखडी_नृत्य

माझ्या गावा मधील
निंबार वाडीतील महिलांनी केलेल्या जाखडी नृत्य आणि मुलांनी केलेला शक्ती तुरा चा नाच

ही जाखडी नृत्यातील अजरामर लोकगीते. खास कोकणी शैलीतील. कोकणातील बहुप्रसिध्द लोककला म्हणजे जाखडी नृत्य. जिला शक्ती-तुरा, चवळी नाच किंवा बाल्या नाच असे देखील म्हटले जाते. महाराष्ट्राच्या अनेक लोककलांमधून चालणारी सवाल जवाबाची जुगलबंदी खऱ्या अर्थाने प्रसिद्धीस आली; ती या जाखडी नृत्याच्या कार्यक्रमांतून. हे जाखडी नृत्य म्हणजे काय?

जाखडी नृत्याचा उगम नेमका केव्हा झाला, कोणत्या काळात झाला याबद्दल खात्रीशीररित्या सांगता येणार नाही. पण पूर्वी पावसाळ्यातील शेतीची कामे आटपल्यानंतर लोक मनोरंजनासाठी एकत्र जमायचे आणि झांज, ढोलकी, घुंगरू या वाद्यांच्या साथीवर देवाची गाणी म्हणायचे, नृत्य करायचे. पायात चाळ बांधून नाचत असल्यामुळे या नाचाला ‘चवळी नाच’ असे म्हटले जात असे. हाच चवळी नाच पुढे कोकणातील लोकांबरोबर मुंबईत आला आणि बाल्या नाच म्हणून प्रसिद्ध झाला. कोकणातून मुंबईत आलेले काही तरुण त्यावेळी घरकामे करीत असत. या घरकाम करणाऱ्या मुलांना मुंबईच्या लोकांकडून बाला म्हटले जात असे. हे बाले आपली सर्व कामे आटपून, रात्रीच्या वेळेस एकत्र जमून आपल्या पारंपारिक लोककलेचा आस्वाद घेत असत. कोकणातून आलेली ही लोकसंस्कृती मुंबईच्या लोकांना अतिशय भावली आणि मुंबईच्या मिश्र संस्कृतीत समाविष्ट झाली. पुढे या परंपरेत दोन संप्रदाय तयार झाले. शक्तीवाले आणि तुरेवाले. शक्ती म्हणजे शिवप्रिया देवी पार्वती आणि तुरा म्हणजे भगवान शिवशंकर. या दोघांमधील प्रश्नोत्तरी भांडण म्हणजे शक्तीतुरा किंवा कलगीतुरा

#mikokaninikhil
#sforsatish
#kokaniranmanus
#kokan_now
#kokani_jivan
#kokaniomkar
#kokani_mulga
#kokaniranmanus
#कोकणीकार्टी.
#kokansanskruti
#malvanilife

Комментарии

Информация по комментариям в разработке