Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत - अध्याय - 46

  • Shinde-Diaries
  • 2021-12-19
  • 66
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत - अध्याय - 46
guruduttgurudevgurudevduttaduttaduttajayantigurucharitraगुरुचरित्रश्रीगुरुचरित्रश्रीगुरुचरित्र - कथासारकथासारGurucharitraShri GuruCharitra KathaSaarGurucharitra AdhyayParayanParayan SaptahShri Narasimha SaraswatiNarasimhaNarasimha SaraswatiSiddhaNamdharakShriguru Narasimha SaraswatiKadaganchiश्रीनृसिंह सरस्वतीश्रीनृसिंहश्रीगुरुचरित्र-वाचनाश्रीगुरुचरित्र-वाचनपारायणश्रीसरस्वती गंगाधरshripadshrivallabhagurudattaparayandattaguru
  • ok logo

Скачать श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत - अध्याय - 46 бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत - अध्याय - 46 или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत - अध्याय - 46 бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत - अध्याय - 46

श्रीपाद श्रीवल्लभांचे मधुर चरित्र घरोघरी पोहचण्यासाठी आपण सर्वांनी ते शेअर करुया जेणे करून आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांच्या कानावर ते पडेल.ही सेवा श्रीपाद श्रीवल्लभांचे संकल्पाने होत आहे. Share this link of playlist that has 1 to 53 Chapters :
   • श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत - अध्याय - 00...  


श्रीपादश्रीवल्लभ चारितामृत ग्रंथाच्या पारायणाचे फळ.श्रीपादांचा गणेशचतुर्थीस अवतार झाला हे विशेश आहे.
"लाभ" हा गणेशाचा पुत्र एका युगात 'लाभाद महर्षी' या नावाने नावाजला होता. तोच श्रीकृष्ण अवतारात नंद या रूपात जन्मास आला. श्री वासवीमाता या भूमीवर भास्कराचार्य या नावाने अवतरल्या. "लाभ" श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारकालात त्यांचे आजोबांच्या स्वरूपात जन्मास आले होते. आपल्या तत्वा मध्ये विघ्नविनाशक तत्व स्थिर करून श्रीपादप्रभु अवतरले. ते अवतरले तेव्हा चित्रा नक्षत्र होते. त्या नक्षत्रापासून सत्ताविसावे नक्षत्र हस्त असताना कुरवपुरात अदृश्य झाले.
जन्म पत्रिकेप्रमाणे २७ नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या नवं ग्रहापासून मिळणारे अनिष्ट फळ निघून जाण्यासाठी श्रीपादांचे भक्त 'मंडल' दीक्षा घेतात. एका 'मंडला' मध्ये श्रद्धा भक्तीने श्रीपादांचे अर्चन केल्यास किंवा त्यांच्या दिव्य चरित्राचे पारायण केल्यास सर्व कामनांची सिद्धी होते.
मन बुद्धी, चित्त आणि अहंकार हे एका दिशेने आपली स्पंदने आणि प्रकंपने सोडीत असतात. त्याचे प्रकंपन वेगळ्या चाळीस दिशांमध्ये प्रसरण पावतात. या चाळीस दिशामधून होणारे प्रकम्पन थांबून श्रीपाद प्रभुकडे वळवले तर ते श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात. तेथे ते अवश्यक बद्ल घडून स्पंदनात रूपांतरित होऊन साधकाकडे पुन्हा येतात. त्या नंतर साधकाच्या धर्मानुकूल सर्व ईच्छा पूर्ण होतात.
भगवान दत्तात्रेय जगदोद्धारासाठी इ. स. १३२०मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री अप्पल राजु आणि सुमती या पुण्यदांपत्याच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ नावाने प्रकट झाले. दत्तात्रेयांचा हा आद्य अवतार होय. त्यानंतर कारंजा क्षेत्रात श्री नृसिंह सरस्वती या नावाने दुसरा अवतार घेऊन अद्भुत असे चरित्र दाखविले.
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण पद्धती
प्रथम दिवस:०१ ते ०६ अध्याय
दुसरा दिवस: ०७ ते १२ अध्याय
तिसरा दिवस: १३ ते १८ अध्याय
चौथा दिवस: १९ ते २२ अध्याय
पाचवा दिवस: २३ ते ३४ अध्याय
सहावा दिवस: ३५ ते ४२ अध्याय
सातवा दिवस: ४३ ते ५३ अध्याय
श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राविषयी सरस्वती गंगाधर रचित "श्री गुरुचरित्र" या मराठी ग्रंथामध्ये फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ अवतार हा श्री दत्तप्रभूंचा प्रथम अवतार किंवा आद्य अवतार होय. श्रीपाद श्रीवल्लभ ख्रिस्त शके १३२०, कृष्ण-लक्ष्मी सौभाग्यवती सुमती महाराणी यांचे तृतीय संतान म्हणून जन्मले.
श्रीपाद चारित्र ग्रंथ पठण विशेष फलदायी
श्रीपाद प्रभुंचे दिव्य चरित्र संस्कृत भाषेत लिहिण्याचा मानस अत्यंत स्तुत्य आहे. हा संस्कृत भाषेतील ग्रंथ कालांतराने तेलुगू भाषेत अनुवादित केला जाईल. अनुवादित केलेल्या ग्रंथाच्या पठणाचे फल व मूळग्रंथाच्या पाठणाचे फल सारखेच आहे. श्रीपाद प्रभूंचे चरित्र कोणीही, कोठेही पठन केल्यास स्वत: श्रीपाद प्रभू तेथे सूक्ष्म रूपाने राहून ते श्रवण करतात.

या संबंधीची एक कहाणी सांगतो. सावधान होऊन ऐक; श्रीपाद सात वर्षाचे झाले. त्यांचा वेदोक्त विधिने उपनयन संस्कार झाला. त्या काळात संपन्न गृहस्थाच्या घरी असे कार्यक्रम असले म्हणजे चोहिकडे अत्यंत आनंदाचे वातावरण असे. बापनार्युलुच्या आनंदाला तर सीमा नव्हती. त्यांनी आपल्या जाती बांधवाना दत्तचरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केले होते. ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने दत्त चरित्र ऐकण्यास आले होते. दत्तदासानी दत्तचरित्र सांगण्यास सुरवात केली. ते म्हणाले ''पूर्वयुगात अनसूया आणि अत्रिमहर्षी या परम पावन दांपत्याला एका पुत्ररत्नाची प्राप्ति झाली. त्याचेच नाव दत्तात्रेय असे ठेवले होते. तेच परंज्योती दत्तात्रेय सध्या या कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने पीठीकापुरम मध्ये अवतरले. त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले. उपनयनानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेज:पुंज दिसू लागले. अशा दीनजन उध्दारक असणाऱ्या प्रभूंचे नित्य मांगल्य होऊ दे.''हीच कथा ते सारखी सांगत होते आणि श्रोते तन्मय होऊन ऐकत होते. असे त्रेपन्न (५३) वेळा कथन झाले. दत्तदासांवर श्रीपाद प्रभूंची अमृत दृष्टी पडली. उपनयनानंतर श्रीपाद तेथे असलेल्या ब्राह्मणांना म्हणाले की ते लगेच मालदासरीच्या घरी जाणार आहेत. जाण्याचे कारण विचारले तेंव्हा श्रीपाद म्हणाले ''विशुध्द अंत:करण असलेला दत्तदास माझे चरित्र सांगत आहे. त्याने एकदा सांगितलेला कथाभाग एक अध्याय असे समजल्यास त्रेप्पन्न अध्याय पूर्ण झाले आहेत. माझ्या चरित्रातील त्रेप्पन्न अध्याय श्रध्देने पूर्ण करणाऱ्याला देण्यासाठी असलेले सद्य:फलीत लगेच त्याला द्यायचे आहे.'' श्रीपाद प्रभूंच्या भक्त वात्सल्याला जाती कुलाचा भेद नाही.
श्रीपाद प्रभूंना दत्तदासांकडे जाण्यासाठी ब्राह्मणांनी अनुमती दिली नाही. तेंव्हा श्रीपाद क्रोधावेशाने म्हणाले ''तुम्ही कोणालाही पंचम म्हणून नीच जातीच्या लोकांना व्रूच्रतेने दाबून टाकीत आहात परंतु त्यांच्या वर माझा कृपा कटाक्ष जास्त असल्याने येणाऱ्या शताब्दींमध्ये ते उन्नत स्थितीत राहतील आणि तुमचे ब्राह्मणत्व, तुमचे अधिकार, त्यांची सेवकवृत्ती धारण करून धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट होतील. माझे वचन म्हणजे काळया दगडावरील रेघ आहे त्यातील एकाही अक्षरात बदल होणार नाही. तुम्हा ब्राह्मणा मधील जे धर्मबध्द होऊन दत्तभक्ति करीत आपले जीवन व्यतित करतील त्यांची मी डोळयात तेल घालून रक्षा करीन.''
श्रीपादांच्या क्रोधावेशाला आई वडिलानी शांत करण्याचा प्रयत्न केला.थोडया वेळाने ते शांत झाले व त्यानी मौन धारण केले.नेमके त्याच वेळी दत्तदासांच्या घरी श्रीपादवल्लभांनी त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपात दर्शन दिले.

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]