Aaichya Hatcha- Mom's Recipes | ft. Renuka Daftardar, Devika Daftardar & Radha Daftardar |

Описание к видео Aaichya Hatcha- Mom's Recipes | ft. Renuka Daftardar, Devika Daftardar & Radha Daftardar |

The Ganpati festival is incomplete without taking the bite out of the home-cooked, melt in your mouth steaming hot Kesar Modaks with loads and loads of desi ghee, karan Shastra Asta Te! Such special recipes take us down the sweetest memory lane with our loved ones, too. So does this Aaichya Hatcha episode with our very own Renuka Daftardar a.k.a. Bhadipachi Aai and her sister Devika, both learning to cook their mother's recipe for scrumptious festive comfort food with of course the mother, Radha Daftardar. Ganpati Bappa Morya! Subscribe to Bha2pa. #ShubhAarambh #YandachaGanpatiGharchyaGhari

उकडीचे मोदक

साहित्य:
१ वाटी खिसलेलं ओलं खोबरं
साजूक तूप
खसखस
अर्धी वाटी गूळ
जायफळ आणि वेलदोडे पूड
तांदळाचे पीठ
मीठ
दूध
केशर
पाणी
बेदाणे

कृती:
सारण: एका कढईत साजूक तुपात एक चमचा खसखस घालून खसखस फुलेपर्यंत हलवत राहावे व त्यात बेदाणे आणि खिसलेलं एक वाटी खोबरं घालून ओलावा निघेपर्यंत भाजून घ्यावं. त्यात अर्धी वाटी गूळ घालून सारण केशरी दिसेपर्यंत व गूळ शिजेपर्यंत परतून एका ताटामध्ये घेऊन त्यावर जायफळ व वेलदोडेची पूड घालून मिश्रण एक जीव करून घ्यावे.
मोदकाची पारी: आंबेमोहोर तांदूळ निवडून स्वच्छ धुवून दोन दिवस घरात वाळवून गिरणीतून दळून आणावे. एका कढईत अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी एकत्र करून चांगली उकळी येऊ द्यावी. १ वाटी पिठामध्ये मीठ घालून नीट एकत्र करून पीठ कढई मध्ये टाकून एकत्र करून कढईवर ताट ठेऊन वाफवून घ्यावे. परातीमध्ये वाफवलेलं पीठ काढून घ्यावं व थोडं कोमट झालं की तुपाचा हात घेऊन मळावं आणि ओल्या कापडाने बांधून ठेवावं.
पिठाचा गोळा लाटून त्यात सारण भरून मोदक बनवून घ्यावेत. प्रत्येक मोदकावर दुधात भिजवलेली केशराची काडी लावून मोदक पाण्यात बुडवून १५ मिनिटे उकडून घ्यावेत.

आंबट डाळ

साहित्य:
५-६ तास भिजवलेली चण्याची डाळ
४ मिरच्या
अर्धा चमचा जिरे
हळद
हिंग
लाल मिरची
जिरे पूड
मीठ
साखर
कोथिंबीर
अर्धी वाटी कैरी/अर्ध्या लिंबाचा रस
खिसलेलं खोबरं

कृती: ५-६ तास भिजवलेली चण्याची डाळ, ३-४ मिरच्या, अर्धा चमचा जिरे आणि हळद जाडसर वाटून घ्यावी. वाटणात एक चमचा हिंग, जिरे पूड, मीठ, साखर, चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा लिंबाचा रस किंवा अर्धी वाटी कैरीचे काप घालून मोहरी, हिंग, अर्धा चमचा हळद, कडुलिंब आणि लाल मिरचीची फोडणी द्यावी व वरून किसलेलं खोबरं घालून एकत्र करावं.

Follow us on :

  / bhadipa  
  / bhadipa  
  / bha2pa  

For more comedy & entertainment, subscribe to Bharatiya Digital Party!
   / bharatiyadigitalparty  

Cast -
Renuka Daftardar
Devika Daftardar
Radha Daftardar

Directed by: Sarang Sathaye
DOP- Aditya Divekar, Ankush Kulal
Location sound: Saurabh Morgaonkar
Edited by: Tanwee Paranjpe, Nachiket Pendse
Creative Producer - Anusha Nandakumar
Social Media: Neel Salekar, Karan Sonawane, Pooja Parab, Aniket Jadhav
Creatives: Sampada Deshpande

Комментарии

Информация по комментариям в разработке