डोळ्याखालील काळी वर्तुळे[Dark Circles]ची कारणे व उपाय Under Eye Dark Circles Symptoms and Treatment

Описание к видео डोळ्याखालील काळी वर्तुळे[Dark Circles]ची कारणे व उपाय Under Eye Dark Circles Symptoms and Treatment

डार्क सर्कल्स ( डोळ्याखाली काळी वर्तुळे) [ Dark Circles ]
डोळ्याखाली काळी वर्तुळे ही मोठ्या प्रमाणावर आढळणारी समस्या आहे यावर तात्पुरते इलाज केले जातात पण समस्येचे मूळ शोधलं तर समस्या पूर्णपणे बरे होऊ शकते.
Dark circles म्हणजे काय?
काही कारणामुळे डोळ्या भोवती काळ्या रंगाची वर्तुळे दिसतात अर्थात हा रंग काळसरपणा ते पूर्ण काळी त्वचा अशा छटांमध्ये
असतो.
कारणे :
१. Dark circles ही बर्‍याच वेळा झोपे शी निगडीत असतात.
२. अनुवंशिकता - बऱ्याचदा आई-वडिलांना जर डोळ्याखाली वर्तुळे असतील तर मुलांनाही डोळ्याखाली वर्तुळ होण्याची शक्यता असते.
३. तणाव
४. जीवनसत्त्वांची कमतरता
५. डोळ्यांवर ताण
६. जागरण
७. कुपोषण
यापैकी अपुरी झोप, तणाव व जागरण ही एकमेकांवर अवलंबून कारणे आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात खूप तणाव आहे त्यामुळे झोप शांत होत नाही अपुरी झोप होते किंवा काही कामानिमित्त जागरण झाल्यास झोप अपुरी होते आणि यामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो व परिणामी डोळ्याच्या आजूबाजूच्या त्वचेवर पेशींवर परिणाम होऊन त्वचा काळवंडली जाते.
उपाय :
- काळवंडलेपणा कशामुळे आहे हे आधी नक्की शोधायला हवं एकदा कारण समजलं की मग त्याप्रमाणे उपाययोजना करता येते.
- जर जागरणामुळे डार्क सर्कल्स होत असतील तर पुरेशी झोप घ्यायला हवी.
- रात्रीच्या वेळी टीव्ही पाहणे अथवा अंधारात मोबाईलवर खेळत बसणे /मोबाईलच्या स्क्रीनवर वाचत बसणे यामुळे डोळ्यावर तान येतो.
- असे लोक सतत लॅपटॉप वापरतात त्यांनी दर अर्ध्या तासाने दोन मिनिटांचा ब्रेक घ्यायला हवा म्हणजे जर तुम्ही सलं अर्धा ते एक तास लॅपटॉपच्या स्क्रीन कडे पाहत असाल तर दोन मिनिटं खिडकीतून बाहेर झाड किंवा निसर्ग यावर नजर टाकावी म्हणजे डोळ्यांचा थकवा जातो.
- डोळ्यावर जर तरीही फार ताण वाटत असेल तर एकदा चष्म्याचा नंबर तपासून पहावा.
- कुपोषण हे जर कारण असेल तर आपण समतोल व चौरस आहार घ्यायला हवा सर्व भाज्या, दूध, फळे खायला हवीत.
- जीवनसत्त्वांची कमतरता हे कारण जेव्हा असते तेव्हा त्या जीवनसत्त्वांच्या गोळ्या अथवा इंजेक्‍शनच्या घेतल्यास ती कमतरता कमी होईल अर्थात हे सर्व डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे.
- जन्मा अनुवंशिकतेने डार्क सर्कल्स आहेत त्यांनी ही पथ्य काटेकोरपणे पाळावीत.
- आता डार्कसर्कल हा कॉस्मेटिकली प्रॉब्लेम असू शकतो त्यावर लगेच उपाय करायचा असेल तर आपल्याकडे केमिकल पीलिंग ही प्रोसिजर असते तसेच त्यामुळे तिथली डेड स्कीन निघून जाते व नवीन त्वचा येते आणि डार्क सर्कल चे प्रमाण कमी होते याबरोबरच काही मलम बाहेरून लावून डार्क सर्कल कमी करता येतील..... पाण्यासोबत मूळ कारण शोधून त्या अनुषंगाने उपाययोजना करणे हितावह ठरते चौरस आणि समतोल आहार पुरेशी झोप आवश्यक तेवढे पाणी पिल्यास त्वचा आपोआप च निरोगी होते.

Комментарии

Информация по комментариям в разработке