बहिणींनी बनवली चिकन दम बिर्याणी 😍 | रविवारचा बेत Chicken Dum Biryani - Panvel (Navi Mumbai)

Описание к видео बहिणींनी बनवली चिकन दम बिर्याणी 😍 | रविवारचा बेत Chicken Dum Biryani - Panvel (Navi Mumbai)

बहिणींनी बनवली चिकन दम बिर्याणी 😍 | रविवारचा बेत Chicken Dum Biryani - Panvel (Navi Mumbai) माझ्या दोन्ही बहिणी आमच्या पनवेलच्या घरी राहायला आल्या आहेत. छोटी बहीण गेल्या पंधरा दिवसापासून आमच्याकडे आहे. मोठी बहीण सुद्धा आर्यनला घेऊन आमच्याकडे आली आहे. दोन्ही बहिणी माहेरी आल्या आहेत तर चांगलं जेवण तर बनणारच. आम्ही रविवारचा बेत चांगला करण्याचे ठरवले त्यासाठी चिकन दम बिर्याणी बनवण्याचे ठरले. कधीतरी आम्ही चिकन दम बिर्याणी घरी बनवत असतो. बहिणीच्या हातचे जेवण सध्या आम्हाला खायला मिळत आहे. चिकन दम बिर्याणी बनवणे अतिशय सोपे आहे परंतु त्यासाठी जीव ओतून जेवण मनापासून बनवावे लागतं. अतिशय चविष्ट, स्वादिष्ट, जिभेला पाणी सुटेल अश्या प्रकारची बिर्याणी आम्ही घरी तयार केली. रविवार म्हटला की मांसाहारी पदार्थ खाण्याचा दिवस असतो. सकाळी लवकर उठुन बाजारातून चिकन घेऊन आलो. घरी आलो की चिकन कापून साफ करून घेतले. बिर्याणीसाठी लागणारे सर्व साहित्य आमच्या घरी होते. आईने गावावरून आणलेल्या काजूच्या बियांचे गर सुद्धा काढले होते. काजूचे गर उकळून ते आम्ही बिर्याणी आणि चिकन सुक्का बनवताना वापरले. मोठ्या बहिणीने चिकन सुक्का आणि तांदळाची भाकरी तयार केली. छोट्या बहिणीने चिकन दम बिर्याणी बनवली. #ChickenDumBiryani #ChickenBiryani #BiryaniAndChickenSukka #sforsatish
बिर्याणी तयार करताना चिकन मिडीयम साईजचे कापून घेतले. बिर्याणी बनवण्यासाठी बासमती राईस 1 किलो वापरला. दही, कोथिंबीर, पुदिना, घरगुती मसाले, शाही बिर्याणी मसाला, टोमॅटो कांद्याचे वाटण, कापलेला कांदा, देशी घी हे सगळं आम्ही वापरलं. बिर्याणी बनवताना खडे मसाले व्यवस्थित वापरावे लागतात. थोडं जरी काही पदार्थ जास्त झाले तरी बिर्याणीची चव बदलते. बासमती राईस उकळून अर्धशिजलेलं उतरून घेतले. चिकन अर्धा तास मॅरीनेट करून फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर चिकन वाटनात घालून शिजवून घेतले. चिकन शिजल्यावर बिर्याणी तयार होण्यासाठी आम्ही लेअर करून दम देण्यासाठी ठेवले. चिकन दम बिर्याणी अतिशय स्वादिष्ट बनली होती. घरातील सर्व माणसे आम्ही एकत्र पंगतीने जेवायला बसतो. प्रांजु आणि आर्यन अगोदरच चिकन सुक्का आणि भाकरी खाऊन झाले होते. आम्ही जेवून झाल्यावर त्यांनी पुन्हा बिर्याणीचा स्वाद चाखला. मोठी बहीण दोन दिवस आमच्या पनवेलच्या घरी राहिली होती. दोन दिवस अगदी मजेत गेले. आमचं पनवेलचं घर अगदी मुलाबाळांना भरलेलं होतं. अद्विक सुद्धा खूप खुश होता. मोठी बहीण प्रगती आणि तिचा मुलगा संध्याकाळी वडाळा येथे घडी जाण्यासाठी निघाले. आमच्या रविवारचा बेत खूप छान झाला होता. आम्ही सर्वांनी चिकन दम बिर्याणी, चिकन सुक्का याचा मनमुराद आस्वाद घेतला होता. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमच्या घरचा रविवारचा बेत आणि आम्ही बनवलेली चिकन दम बिर्याणी दाखवली आहे. दम बिर्याणीचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.

तुमचे प्रेम असेच कायम असुद्या!

मला संपर्क करण्यासाठी फेसबूक आणि इंस्टाग्रावर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Комментарии

Информация по комментариям в разработке