रानभाज्या स्टॉल सारणी तेथे सीजन नुसार वेगळे गावठी फळ, फुल,भाज्या या ठिकाणी नेहमीच उपलब्ध असतात.

Описание к видео रानभाज्या स्टॉल सारणी तेथे सीजन नुसार वेगळे गावठी फळ, फुल,भाज्या या ठिकाणी नेहमीच उपलब्ध असतात.

हा व्हिडिओ बनवण्याचा माझा एकच उद्देश आहे की सेंद्रिय भाज्या शोधून मिळत नाही.व आदिवासी महिलांचे स्टॉल आहेत येथील जास्तीत जास्त विक्री व्हावी हाच आहे. भाज्यांची माहिती
१) वास्ता (कोवळा बांबू): ह्या बांबूची निवड कोवळा बांबु सिंद घ्यायचा व पक्व झालेला फेकणे. लहान लहान तुकडे पाडून 2 वेळा उकळवणे.व पाणी फेकून देणे. सिंद ही भाजी करून खाणे आणि खरात (बरणी मध्ये मिठाच्या पाणीत ठेवणे.) वर्ष भर राहू शकते.
२)टेटू(तेटव): राना, वनात उपलब्ध असते.ही पाऊस आल्यावर श्रावण महिन्यात याचा बाझ होतो. टेटू तोडणी करत असताना. फांद्या न तोडता तोडले तर जास्त फळ धारणा जास्त होते. आयुर्वेदिक भाजी आहे. भाजी करत असताना 2 वेळा उकळवून निवळवणे.ही खारात टाकू शकतो. जर पोटात दुखत असेल तर उकळवळेले पाणी 10 ते 20ml पिऊ शकतो.
3) काकडी(वालुक): ही सेंद्रिय असते राबत लागवड असते ही मीठ लावून खाल्यास मस्त टेस्ट येते.
४) तेरा: पालेभाजी आहे ही डाळीत टाकून खायची चांगली
असते. व आयुर्वेदिक पालेभाजी आहे.
५) इंदवीचे फुल:हे फुल जंगलातून आणतात व गवरी पूजा करण्यासाठी वापरतात. इत्यादी...
पालघर जिल्ह्या,डहाणू तालुक्यातून सारणी डहाणू ते जव्हार रोडच्या मध्ये डहाणू पासून 19km अंतरावर व चारोटी पासून 4kmअंतरावर हे स्टॉल आहे. येथे 12 ही महिने गावठी वस्तू भेटत असतात. एकूण 30 ते 35 स्टॉल असतात. त्यातून दुसरे बंद असल्या कारणाने मी सर्व व्हिडिओ मधून दाखवले नाही.
हा व्हिडिओ बनवत असताना.
अजय घाटाळ, निलेश सुतार, सूर्यकांत गावित व जननायक बिरसा मुंडा मंडळ निकने , तसेच स्टॉल लावलेल्या महिला यांचा सपोर्ट भेटला. हो आणि माझी सुरवात आहे थोड्या चुका होतील. अधिक माहितीसाठी सपर्क: सुधीर घाटाळ मो.नं 9834756487
होय आणि जास्तीत जास्त खरेदी करा कारण आता सेंद्रिय उपलब्ध आहे नाही तर ह्या भाज्या मिळणे शक्य राहणार नाही.
   • निकणे कातकरीपाडा येथे सुंदर आवाज असणा...  

Комментарии

Информация по комментариям в разработке