पोर्तुगीज भाषा बोलणारं भारतीय गाव | कोर्लई | Portuguese speaking village in India | Korlai

Описание к видео पोर्तुगीज भाषा बोलणारं भारतीय गाव | कोर्लई | Portuguese speaking village in India | Korlai

पोर्तुगीज भाषा बोलणारं भारतीय गाव | कोर्लई | Portuguese speaking village in India | Korlai 
पोर्तुगीज दर्यावर्दी १४९८ साली भारतीय किनाऱ्याला लागले आणि हळूहळू त्यांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पाय पसरायला सुरुवात केली. ते आपल्या अलिबाग येथील चौल गावी आले आणि मोक्याचे ठिकाण हेरून तेथे किल्ला बांधला. तेथेच वसाहत बनवून जवळपास सव्वा दोनशे वर्ष चौल आणि परिसरावर राज्य केल्यानंतर १७३९ साली वसईच्या मोहिमेदरम्यान मराठ्यांनी त्यांचा पाडाव केला. त्यावेळी चौल येथील वसाहतीतील लोक गोवा आणि इतर पोर्तुगीज वसाहतीकडे निघून गेले तर काही लोक कोर्लई चर्चशेजारी वसाहत करून राहू लागले.
अजूनही ह्या लोकांना चौलकर ह्या नावाने देखील संबोधले जाते. कोर्लईत राहणाऱ्या ह्या लोकांची भाषा म्हणजे 'नॉलिंग' भाषा. नॉलिंग म्हणजेच 'आमची भाषा'. स्थानिक लोक आपल्या ह्या भाषेला पोर्तुगीज भाषा असे देखील संबोधतात. काही अभ्यासक ह्या भाषेला 'क्रिओल पोर्तुगीज' देखील म्हणतात. ही भाषा पोर्तुगीज भाषेशी जरी साम्य असणारी असली तरी आत्ता ती मराठी व इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे हळूहळू तिचे मूळ रूप हरवून बसली आहे. २०-२५ वर्षांपूर्वीची नॉलिंग आणि आत्ताची नॉलिंग ह्यात बराच फरक पडलेला आहे. 
सध्याच्या घडीला जवळपास ८००-१००० लोक ही भाषा बोलतात.
चला तर कोर्लईच्या लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधून ह्या आगळ्यावेगळ्या भाषेविषयी अधिक माहिती मिळवूया.
विशेष आभार: कोर्लई ग्रामस्थश्री. निलेश नाईक, चौल - अलिबाग
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
हा व्हिडीओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक  / sunildmellovideos  
इन्स्टाग्राम  / sunil_d_mello  
ईस्ट इंडियन संस्कृतीशी निगडित इतर व्हिडिओ
ईस्ट इंडियन_कुपारी खाद्यपदार्थ   • East Indian_Kupari Recipes ईस्ट इंडिय...  
वसईतील लग्नसोहळा   • Vasai wedding वसईतील लग्नसोहळा  
कुपारी संस्कृती   • Kupari culture कुपारी संस्कृती  
#korlai #creole #noling #nolingportuguese #indiancluture #culture #languages#sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #vasai #culture #portuguese #portugueseindia

Комментарии

Информация по комментариям в разработке