Maratha Reservation Hyderabad Gazette : CM शिंदे हैदराबाद गॅझेट लागू करणार अशी चर्चा, प्रश्न सुटणार?

Описание к видео Maratha Reservation Hyderabad Gazette : CM शिंदे हैदराबाद गॅझेट लागू करणार अशी चर्चा, प्रश्न सुटणार?

#BolBhidu #HyderabadGazette #MarathaAarakshan

एकच मिशन मराठा आरक्षण म्हणत मराठा समाजाने परत एकदा आक्रमक भूमिका घेतलेली आहे कारण राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून कायम आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार करण्याचा निर्णय घेतला असून येत्या 17 सप्टेंबरपासून ते पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. महाराष्ट्रात मागील वर्षभरापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न धुमसत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, या मागणीसाठी मनोज जरांगे हे सातत्याने उपोषण आणि आंदोलन करत सरकारची कोंडी करत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या सरकारविरोधी भूमिकेचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला मोठा फटका बसला. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीतही आरक्षण प्रश्नाचा फटका बसू नये, यासाठी सरकार दरबारी हालचाली सुरू झाल्या असून राज्य सरकार लवकरच हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाचं जाळं खूप मोठं असून ते जाळं सगळीकडे पसरलेलं आहे. जरी मराठवाड्‌यात कुणबी नोंदी कमी सापडलेल्या असतील तरी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी तसेच सरसकट समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगेंनी नेहमीच केली आहे. आणि म्हूनच हैद्राबाद गॅझेट परत एकदा चर्चेत आले आहे. आज माहिती घेऊ हे हैद्राबाद गॅझेट लागू करून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल का?

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке