यंदाची नागपंचमी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्त्व

Описание к видео यंदाची नागपंचमी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्त्व

यंदाची नागपंचमी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्त्व

नमस्कार, आपल्या लोकप्रिय "2kcreation" चॅनेल वर आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाग पंचमीविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करुया...


दरवर्षी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक नागाची पूजा करतात. वासुकी नाग हा भगवान शिवाच्या गळ्यातील माळ आहे, तर भगवान विष्णू शेषनागाच्या पलंगावर झोपलेले असतात.

धार्मिक मान्यतेनुसार, पृथ्वीचे वजन शेषनागाने पेलले आहे, तर वासुकी ही समुद्रमंथनाच्या वेळी मजबूत दोरी होती, त्यामुळे समुद्रमंथन झाले, त्यातून अमृतासह अनेक मौल्यवान वस्तू बाहेर पडल्या आणि श्रीहीन देवांना पुन्हा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळाला.


साप विषारी असला तरी तो मानवाचा शत्रू नसतो, शेतकऱ्यांचा तो मित्रच मानला जातो. नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केली जाते जेणेकरून सापांची भीती राहू नये,

त्यांच्यापासून आपले आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण व्हावे. यासाठी नाग देवतेची पुजा केली जाते. चला तर नागपंचमी पूजेचा शुभ काळ कोणता? याविषयी माहिती जाणून घेऊ.

नाग पंचमी 2023 तारीख –


हिंदू कॅलेंडरनुसार, नागपंचमीसाठी श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथी सोमवार, 21 ऑगस्ट रोजी सकाळी 12:21 ला सुरू होईल आणि ही तिथी मंगळवार, 22 ऑगस्ट रोजी पहाटे 02:00 वाजता समाप्त होईल. सूर्योदयाच्या तिथीनुसार यंदा नागपंचमी सोमवारी, 21 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे.


नाग पंचमी 2023 पूजेचा शुभ मुहूर्त –

21 ऑगस्ट रोजी नागपंचमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त 2 तास 36 मिनिटे आहे. त्या दिवशी पहाटे 05:53 पासून नागपंचमीची पूजा करू शकता. नागपंचमी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी साडेआठ वाजेपर्यंत आहे.


नागपंचमी शुभ आणि शुक्ल योगात –

यावर्षी नागपंचमीच्या दिवशी 2 शुभ योग तयार होत आहेत. 21 ऑगस्ट रोजी सकाळपासून रात्री 10.21 पर्यंत शुभ योग आहे. त्यानंतर शुक्ल योग सुरू होईल, जो संपूर्ण रात्रभर राहील. या दिवसाचा अभिजित मुहूर्त सकाळी 11.58 ते दुपारी 12.50 पर्यंत आहे.



नागपंचमीचे महत्त्व –

नागपंचमीला सापांपासून स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण व्हावे, यासाठी नागांची पूजा केली जाते. याशिवाय कुंडलीत कालसर्प दोष असेल तर नागपंचमीला पूजा केल्याने लाभ होतो. महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे नागपंचमी निमित्त मोठी यात्रा भरते.

जिवंत नागांची पूजा करण्याची येथे मोठी परंपरा आहे. तसेच उज्जैनचे नागचंद्रेश्वर मंदिर वर्षातून एकदाच नागपंचमीला उघडते. या दिवशी पूजा केल्याने कालसर्प दोष शांत होतो. नागपंचमीच्या दिवशी या मंदिरात मोठी गर्दी असते.



यंदा ५९ दिवसांचा श्रावण; श्रावणातील सण-उत्सव आणि प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्व जाणून घेण्यासाठी या व्हिडिओ वर क्लिक करा.


मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर 'Like', 'Share' आणि Comments नक्की करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकप्रिय "2kcreation" चॅनेलला "Subscribe" करा.


धन्यवाद...


nagpanchami in marathi

Комментарии

Информация по комментариям в разработке