ह्रदयस्पर्शी कविता || शीर्षक :- लाडकी बहिण (सुवर्णा काळे यांच्या आवाजात) ||

Описание к видео ह्रदयस्पर्शी कविता || शीर्षक :- लाडकी बहिण (सुवर्णा काळे यांच्या आवाजात) ||

लाडकी बहिण

खेळ लाडकी बहिण
दादा केलास तू सुरू
नोंदणीची बोंबाबोंब
सांग किती मी रे फिरू

तुझ्या दाजीला बोलले
नाही त्यांच्या कडे वेळ
ह्याच्या कागद पत्रांचा
कसा लागावा रे मेळ

माझ्या आधी बघ दादा
तुझ्या दाजीचे रे हाल
म्हणे मेहुणा खेळतो
आता नवी एक चाल

काही झाला का करार
किती दिवस देणार
अन् तुझ्या मागे दादा
हामी कोण रे घेणार

दादा आरक्षणा साठी
हात, पाय तू हालव
कर मुलं, बाळं सुखी
राज तुझंच चालव

तुझ्या दाजीच्या मनात
सदा एक हुरहुर
असे लावून आमिष
कुठे करशील दूर

नाही म्हणणार नाही
तुझ्या साडी नि चोळीला
किती लावशी ठिगळं
माझ्या फाटक्या झोळीला

तुझ्या डोळ्यां मध्ये दिसे
विकासाची तळमळ
वाहो प्रेमाचे हे झरे
सर्व काळी खळखळ

गिरिजा मोहन भुमरे
छत्रपती संभाजी नगर

Комментарии

Информация по комментариям в разработке