Majha Katta : शिवरायांसाठी आयुष्य वाहून घेणारे Babasaheb Purandare! शिवकाळ जिवंत करणारे शाहीर :भाग 2

Описание к видео Majha Katta : शिवरायांसाठी आयुष्य वाहून घेणारे Babasaheb Purandare! शिवकाळ जिवंत करणारे शाहीर :भाग 2

मुंबई : शिवचरित्रासाठी आयुष्य वाहिलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी माझा कट्टा कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी देखील सांगितल्या. सोबतच शिवचरित्राचा प्रवास देखील उलगडवून सांगितला.

महाराष्ट्रात 352 किल्ले आहेत. समुद्र किनाऱ्यावर 65 किल्ले आहेत. माझ्याकडं अनेकदा लोकं येतात की अमक्या किल्ल्याला असं करायचं आहे तसं करायचं आहे. कितीतरी किल्ले असे आहेत ज्या किल्ल्यांवर काहीही राहिलेलं नाही, अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली. किल्ल्यांचं सवर्धन करण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले. आपलं महाराजांविषयीचं प्रेम वरवरचं आहे. काही गोष्टी पाहिल्यानंतर काही वेळासाठी आपलं प्रेम उफाळून येतं. किल्ल्यांवर नाव लिहिण्यासारखे प्रकार लोकं करतात, असंही बाबासाहेब म्हणाले.

Комментарии

Информация по комментариям в разработке