तुमच्याजवळ आहेत का ही खरी सोन्याची पानं ?

Описание к видео तुमच्याजवळ आहेत का ही खरी सोन्याची पानं ?

नमस्कार मित्रमैत्रिणींनो,
दसऱ्याच्या सणाला आजवर आपण सगळ्यांनी आपट्याच्या झाडाच्या पानांना सोन्याच्या पानांचा दर्जा देत ही पानं मनोभावे वाटली, सोनं म्हणून लुटली.
पण तुम्हाला माहितीये का, आपल्याजवळ खरीखुरीसुद्धा सोन्याची पानं आहेत, फक्त आपण त्यांना विसरलोय.
मी उजाळा दिलाय या तुमच्या स्मृतींना, माझ्या नव्या दृष्टीकोनातून...
कोणत्याही गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं की ती गोष्ट आपल्याला नवी भासायला लागते हा माझा जीवनमंत्र आहे.
मी सांगणार असलेली ही सोन्याची पानं नेमकी कोणती ? ती कुठे सापडतील ? आमच्याजवळसुद्धा ही पानं आहेत का ?
सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी माझा व्हिडीओ शेवटपर्यंत पहात रहा.

माझ्या चॅनलवरील इतर व्हिडीओही नक्की पहा आणि व्हिडीओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच आणखी सुंदर विषय आपल्यापुढे मी घेऊन येत राहीन.

#दसरा #विशेष #गप्पाष्टक

Комментарии

Информация по комментариям в разработке