७० लाखांची अमेरिकेतली नोकरी सोडून विनायक यांनी घेतला IAS बनण्याचा निर्णय| Vinayak Narawade IAS | CMP

Описание к видео ७० लाखांची अमेरिकेतली नोकरी सोडून विनायक यांनी घेतला IAS बनण्याचा निर्णय| Vinayak Narawade IAS | CMP

चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : https://t.me/chanakyamandalpariwaroff...

७० लाखांची अमेरिकेतली नोकरी सोडून विनायक यांनी घेतला IAS बनण्याचा निर्णय! देशात ३७ वा क्रमांक पटकावणाऱ्या विनायक नरवडे यांचे मनोगत!

UPSC परीक्षेत चाणक्य मंडल परिवारचे उत्तुंग यश १८१ पेक्षा जास्त विद्यार्थी यशस्वी

पुणे, २४ सप्टेंबर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखती २२ सप्टेंबरला संपल्यानंतर दोनच दिवसांत अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून दरवर्षीप्रमाणेच चाणक्य मंडल परिवारच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. यंदा चाणक्य मंडलचे १८१ पेक्षा जास्त विद्यार्थी अंतिम यादीत निवडले गेले आहेत. या विद्यार्थ्यांनी चाणक्य मंडलमध्ये पूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा, मुलाखत अशा विविध टप्प्यांवर मार्गदर्शन घेतले होते.

गेल्या वर्षी कोरोना काळात सर्वच परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले होते. यूपीएससीलाही पूर्वपरीक्षा पुढे ढकलावी लागली होती. मात्र सुधारित तारीख देऊन ठरलेल्या दिवशी ती परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर मुख्य परीक्षा आणि मुलाखतीदेखील यशस्वीरीत्या घेण्यात आल्या.

पहिल्या दहात दोन, विसात पाच, ५० मध्ये २०, १०० मध्ये ३२, आणि २०० त तब्बल ५८ विद्यार्थी चाणक्य मंडल परिवारचे आहेत. अपाला मिश्रा ही चाणक्य मंडलची विद्यार्थिनी देशात नववी आली आहे. महाराष्ट्रात पहिली आलेली मृणाली जोशी देशात ३६ वी आली आहे. तिने चाणक्य मंडलमध्ये फाउंडेशन कोर्स केला असून UPSC चेही मार्गदर्शन घेतले आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचे तिचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी भारतीय पोलीस सेवेसाठी निवडला गेलेला चाणक्य मंडलचा विद्यार्थी आणि प्राध्यापक सुब्रह्मण्य केळकर यावर्षीही निवडला गेला आहे. 'धर्माधिकारी सरांचं मार्गदर्शन, अभ्यासाची योग्य दिशा आणि त्यातले सातत्य यामुळे सलग दुसऱ्या वर्षी यशाला गवसणी घालता आली अशी प्रतिक्रिया सुब्रह्मण्यने व्यक्त केली.

'मागील वर्ष विद्यार्थ्यांचा संयम तपासणारे होते. देशभरात लॉकडाऊन लागू असल्याने वर्गातील तास घेणे, किंवा अभ्यासिका सुरू ठेवणे शक्य नव्हते. यातून मार्ग काढत चाणक्य मंडल परिवारने ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांची तयारी करवून घेतली. परीक्षांचे वेळापत्रक पुढे जात असताना त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी आमच्या प्राध्यापकांनी जास्तीचे तासही घेतले. अशा कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचं नेहमीपेक्षा जास्त कौतुक वाटतं. शिवाय चाणक्य मंडलच्या रौप्य महोत्सवी वर्षात मोठं यश संपादित केल्याचा आनंदही आहे', अशी प्रतिक्रिया चाणक्य मंडल परिवारचे संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केली. निवडले गेलेले विद्यार्थी स्वच्छ आणि कार्यक्षम राहून 'कार्यकर्ता अधिकारी' वृत्तीने प्रशासन चालवतील असा आम्हाला विश्वास आहे, तशीच आमची शिकवण असल्याचे ते म्हणाले.
'नियमित वैयक्तिक मार्गदर्शन, तज्ज्ञ प्राध्यापकांची अद्ययावत अशी माहितीपर सत्रे, यूपीएससीच्या धर्तीवर आधारित सखोल सराव चाचण्या आणि अभिरूप मुलाखती अशा परिपूर्ण मार्गदर्शनामुळे यशाचा आमचा प्रवास सुलभ झाला', अशी प्रतिक्रिया स्वच्छ आणि कार्यक्षम होण्यासाठी सज्ज झालेल्या चाणक्य मंडल परिवारच्या भावी 'कार्यकर्ता अधिकाऱ्यां'नी व्यक्त केली.

#upsc #IAS #topper


चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : https://t.me/chanakyamandalpariwaroff...

For further details contact us on www.chanakyamandal.org
For Online Courses, visit: www.lms.chanakyamandal.org
To get more details, dial: 08069015454
To get more study materials & important information, join our official telegram group :
https://t.me/chanakyamandalpariwaroff...
Subscribe and follow us on Youtube: https://www.youtube.com/channel/UCz19...
For more updates follow us on Facebook:   / chanakya.man.  .

Комментарии

Информация по комментариям в разработке