भाग १७ | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन| निवडक भजन | BHAJAN SANGRAH | SHRI MOHAN GAIGOL COLLECTION

Описание к видео भाग १७ | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन| निवडक भजन | BHAJAN SANGRAH | SHRI MOHAN GAIGOL COLLECTION

आमच्या चॅनल ला आपण दान देऊ शकता 🙏🙏
GOOGLE PAY : 7038205363

You can contribute to our channel :
GOOGLE PAY : 7038205363

८१.
देवाने धनवान तुला रे, गर्वांसाठी केला का?
आयुष्याचा नाश कराया, नर-जन्मी या आला का? ।।
का विकसी गायीला कसाबा,असा भिकारी झाला का ?
दारु-जुवाबाजी रे करुनी, कुणी तरी उध्दरला का? ।।
बैलाला ढोससी तुतारी, आत्मा त्यांचा कळला का ?
तसाच ढोसिल देव तुलाही मंत्र न अजुनी कळला का? ।।
गरिबांना नच अन्न जरा दे, यश संसारी येइल का?
तुकड्यादास म्हणे तुज मनुजा ! देव अंति सुख देइल का? ।।

८२.
हात धरोनि न्या मज आता, अगम निगम सुगमाला ।।
डोळे असूनि दिसे ना काही , समजु कसा मी त्याला ।
ऐकु ये पण ओळख नसता , लागु कसा नादाला ।।
गुरुपद कमली नाद वाहतो, सोहं ध्वनि उन्मनिला ।
जिकडे तिकडे प्रकाश पसरे, प्रकाश हा कोणाला ।।
पाहतो कोण तो कुणास पाहे, काय विषय बघण्याला ।
सत् चित आनंदाच्या उर्मी , उठती का स्वरुपाला ।।
म्हणोनिच म्हणतो धरा हात हा, अनुभव मज होण्याला ।
तुकडयादासा सत् गुरुचे बळ, पार करील द्वैताला ।।

८३.
जगशील कसा तू सांग गड्या ?
उद्योगची करणे नाहि तुला?
फिरतोस रिकामा दिवसभरी,
तुज कोण घरी ठेवील मुला ?।।
या तरूणपणी अति आळस हा,
व्यभिचार कराया लावितसे ।
व्यसनाधिन माणुस पाप करी,
मग चोरी कराया जात खुला ।।
जी गुंड उनाड मुले असती,
भुलवोनि तुला फसवीतिल ना?
असलास जरी पदवीधर तू,
तरि लोक कसे म्हणतील भला ? ।।
धनधान्य जरी भरले वडिले,
तरि कोठवरी टिकणार असे?
ही शान तुझी दो दिवसांची !
मग भीकचि मागशि जनतेला ।।
म्हणुनी तुज विनवितसे सखया !
तू एक कला तरि घे पदरी ।
तुकड्या म्हणे नाहितरी जगणे,
हे योग्य नसे भूवरि तुजला ।।

८४.
विश्वचि घर भासुनी, जीव हा होत सदा दंग ।
प्रगटतो भक्तीचा रंग । असा हा संतांचा संग ।।
सेवेची सत्ता, लाभते भक्तांच्या हाता ।
होतसे ब्रह्मचि निज अंग । असा हा संतांचा संग ।।
अहंकार गळतो, लोभ हा त्यागाने पळतो ।
चढतये प्रेमाची भंग । असा हा संतांचा संग ।।
दुःख न मरणाचे, मिळे जरि सुख न राज्याचे ।
म्हणे तुकड्या न उरे व्यंग । असा हा संतांचा संग ।।

८५.
कुठवरी भोगशिल मोजा ?मग येति यमाच्या फोजा रे! ।।
धन-दारा-सुत-साथी सगळे, राखतील दरवाजा ।
अंतकाळि देतील लोटुनी, काढ्नि घेती बाजारे ! ।।
हालिमहाली पोटे सगळे, आजचि म्हणती राजा |
शेवट कोणी साथ करी ना,का भुलसी या साजा रे! ।।
चालतिचे हे गोत, पाहुणे, आले अपुल्या काजा ।
काज सोडुनी व्यर्थ भटकसी,काळ वाजवी बाजा रे! ।।
चोऱ्यांशीचा फेरा पडतो, कोण भोगि तब आजा?
तुकड्यादास म्हणे भय मोठे,भज-भज सद्गुरु-राजा रे! ।।

Комментарии

Информация по комментариям в разработке