वालाच्या बिरड्या/ बिरड्याची ऊसळ (मोड आलेल्या)

Описание к видео वालाच्या बिरड्या/ बिरड्याची ऊसळ (मोड आलेल्या)

वालाची ऊसळ( बिरड्या मोड आलेल्या )
बिरड्या करायची पद्धत :-
कडवे वाल पाव किलो साधारण १०-१२ तास भिजत घालावेत .
नंतर उपसून पातळ कपड्यात बांधून उबदार जागी ठेवावेत . १५-२० तासांनी मोड येतील .
मोड आलेले वाल दोन तास कोमट पाणयात भिजत घालावे.
हाताने बोटाच्या चिमटीत धरून साले काढावीत.
बिरड्या सोलून घ्याव्यात.
वालाची ऊसळ( बिरड्या मोड आलेल्या )
साहित्य :-
१/२ किलो सोललेल्या बिरड्या
२ टेबल स्पून सुके वा ओले खोबरे भाजून ,कुटून
१ चमचा जीरे भाजून , कुटून
१ वाटी (१/२ अर्धा नारळ खवून )
१ चमचा कश्मीरी लाल तिखट
१ चमचा नेहमीचे तिखट
४-५ सुक्या व ३-४ हिरव्या मिरच्या (ॲापशनल)
मीठ चवीनुसार
गूळ चवीनुसार
डावभर तेल
७-८ कढीलिंबाची पाने
मूठभर चिरलेली कोथिंबीर
फोडणी साहित्य :- मोहरी, जिरे, हिंग, हळद
कृती :-

कढई मधे थोडे ओले वा सुके खोबरे व जीरे भाजून जाडसर कुटावेत .
मोड आलेले वाल सोलून बिरड्या कोमट पाणयात घालाव्यात.
कढईमधे एक डाव तेलाची फोडणी करावी.
मोहरी ,हींग,जीरे,हळद,कढीलिंब,लाल व हिरवी मिरची अख्खी (ॲापशनल)करावी .
त्यात सोललेल्या बिरड्या फोडणीत घालाव्यात.
कढईवर झाकणात पाणी ठेवून बिरड्यांना चांगल्या दोन वाफा येऊ दयाव्यात.
बिरड्या बोटचेप्या शिजल्या की त्यात दोन वाट्या उकळते पाणी , लाल कश्मीरी व साधे आपले घरचे तिखट, भाजून कुटलेले जीरे, खोबरे , मीठ,गूळ चवीनुसार घालावा.
गूळ जरा थोडा जास्त घालावा कारण बिरड्या कडवट असल्याने उसळ उग्र लागते,त्यामुळे गोडसर चव छान वाटते .
थोडा नारळ वगळून उरलेला नारळ,कोथिंबीर शिजतानाच घालावे.
बिरड्या चांगल्या शिजल्या की अंगाबरोबर रस ठेवून गॅस बंद करावा.
वाढताना बाऊल मधे काढून खोबरे, कोथिंबीर वर घालावी.
टीप:-
बिरड्याच्या ऊसळीत त्या नीट शिजलेल्या हव्यात पण मोडता कामा नयेत.
त्यासाठीच वाफेला ठेवलेली उसळ अवसडून शिजवावीव नंतरही डावाने सारखी ढवळू नये.चमच्याने अलगद हलवावी.
बिरड्या वाफेवर शिजवल्याने त्याचा उग्र व कडवट वास नाहिसा होतो.
नारळ खोवलेलाच जितका जास्त घालू तेवढी चव छान येते.
नारळ किसायचा वा वाटायचा नाही .
जर लाल तिखट आवडत नसेल तर ६-७ हिरव्या मिरच्या , आले, कोथिंबीर वाटून घालूनही ऊसळ मस्त होते .

Комментарии

Информация по комментариям в разработке