Most Dangerous Trekk | महाराष्ट्रातील अत्यंत कठीण श्रेणीत मोडला जाणारा किल्ला | Kalavantin Durg |

Описание к видео Most Dangerous Trekk | महाराष्ट्रातील अत्यंत कठीण श्रेणीत मोडला जाणारा किल्ला | Kalavantin Durg |

दुर्ग कलावंतीण
दुर्ग कलावंतीण हा मुंबई-पुणे गतिमार्गावरून पुण्याकडे जाताना पनवेलच्या पूर्वेला माथेरानच्या रांगेत असलेला एक डोंगरवजा किल्ला आहे.

कसे जाल?
हा गड मुंबई-पुणे हायवेवरून दिसतो. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर (NH4) शेडुंग फाट्यापासून गडाकडे जायचा मार्ग आहे. कळंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास जेथे मुंबई-पुणे महामार्ग जोडला जातो तेथे शेडुंग फाटा लागतो. पनवेलमधील वरुण गांधी हॉस्पिटलजवळ सहा आसनी रिक्षाने ठाकुरवाडी गावामध्ये उतरता येते. १० लोकांचे साधारणतः २००-२५० रुपये द्यावे लागतात आणि दुसरा मार्ग म्हणजे पनवेल ते ठाकुरवाडी बससेवा आहे. माणशी १२ रुपये बसचे टिकीट आहे. ठाकुरवाडीला आल्यावर प्रबल गडाच्या दिशेने पायी पायी जावे लागते.

कलावंतीण दुर्गाचा इतिहास
कोण्या राजाचे कलावंती राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून न जावी म्हणून त्या राजाने कलावंती राणीला त्या किल्ल्यावर महाल बांधून दिला. हा दुर्ग प्रबल गडाच्या लगतच्या भागाला लागून आहे. संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकाचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्ये करतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चांदेरी व पेब दुर्ग, इर्शल गड, कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते.

आमचे नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!

धन्यवाद !!
Music from #InAudio: https://inaudio.org/
Track Name.inaudio - Infraction - Alioth
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

►YouTube - Psycho Prashil
►Facebook - Prashil Ambade
► Instagram- Prashil Ambade

► Youtube - https://youtube.com/channel/UC6fOaVgA...
► Facebook -  / prashil.amba.  .
► Instagram -   / prashilambade  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

#kalavantin_durg #thrilling #maharashtra_fort

Комментарии

Информация по комментариям в разработке