Andaaz Aarshacha Wate Khara | Marathi Gazal | Ilahi Jamadar | Gazal Nawaz Bhimrao Panchale |

Описание к видео Andaaz Aarshacha Wate Khara | Marathi Gazal | Ilahi Jamadar | Gazal Nawaz Bhimrao Panchale |

अंदाज आरशाचा ...


कदरदान रसिक मित्रांनो... आदाब !

" माणसे गेली कुठे ? "
हा प्रश्न आपल्या गज़लेतून विचारणारा ' इलाही ' आता दूर निघून गेलाय -
क्षितिजाच्याही पलीकडे...

आरशाचा अंदाज खोटा ठरेपर्यंत , म्हणजे माणूस माणसासारखाच वागत आहे.., हा इत्मिनान आरशाला वाटे पर्यंत इलाहीची ही गज़ल गावी लागणार आहे...
ही गज़ल पेश करण्याची गरज संपेल तो सोन्याचा दिवस असेल अवघ्या मानव समाजासाठी ...
असो !

गज़ल संमेलनाचा समारोप माझ्या गज़ल गायनाने व्हावा हा अलिखित सिलसिला कायम आहे , अगदी वाशीच्या नवव्या संमेलनापर्यंत ...

हे आनंदाचे असले तरी ,
गज़ल संमेलनाचे आयोजन म्हणजे आधी आणि नंतर असे एकूण तिन-चार महिने गारद होणे , त्याबरोबरच प्रचंड कष्ट , पैसा उभा करण्यासाठी मरमर , धावपळ , तब्येतीची-आवाजाची वाट लागणे , रियाजात आणि मैफिलीत खंड.. , हे सगळे आलेच ओघाने...आणि -
अशा शिणलेल्या अवस्थेत , जीवाचा कान करून ऐकायला उत्सुक अशा मायबाप रसिकांसमोर गायला बसणे...

गोवा गज़ल संमेलनानंतर वाटत होते की, आता यापुढे आपल्याच्याने हे होऊ शकणार नाही ..झेपणारच
नाही आपल्याला ...पण -
गायला बसलो की , गज़लच उर्जा बनून तनामनात अवतरते...
संमेलनाच्या निमित्ताने आलेले विदर्भ आणि मुंबईतले माझे सगळे साथीदार कलावंत साथीला बसतात . गज़लमंच सुरांनी भरून जातो . रसिकांना अभिवादन करून वाचस्पती रागाचा षड्ज लावतो आणि त्या सुरावटीसोबतच गज़लचे शब्द येतात ...

" अंदाज आरशाचा , वाटे खरा असावा..."

२०१७ साली , वाशी-नवी मुंबई येथे आयोजित केलेल्या ९ व्या अखिल भारतीय मराठी गज़ल संमेलनाच्या समारोपीय मैफिलीत रसिकांना ऐकवलेली तीच गज़ल आज तुमच्या सेवेत पेश आहे , इलाहीच्या आठवणींचा जागर म्हणून...


जरूर ऐका मित्रांनो...


आपला स्नेहांकित ,

ग़ज़ल नवाज़ भीमराव पांचाळे
Gazal Nawaz #BhimraoPanchale​


For More Updates Follow Me At -
______________________________________________________________

★ Facebook https://bit.ly/BhimraoPanchaleFB​

★ Twitter https://bit.ly/BhimraoPanchaleTweet​

★ Instagram https://bit.ly/BhimraoPanchaleInsta​

______________________________________________________________

Subscribe To My YouTube Channel -- ‪@gazalnawazbhimraopanchale6816‬

Useful Words - Ghazal , Ghazal Singer , Marathi Gazals , Marathi Gazal Singer , Marathi Ghazals , Marathi Ghazals Singer , Ghazal Nawaz Bhimrao Panchale , Bhimrao panchale ghazals , urdu ghazals , Gazal Nawaz , Bhimrao Panchale ghazals, Bhimrao Panchale gazals live

Комментарии

Информация по комментариям в разработке