नेहमी तरुण दिसण्यासाठी फक्त हे 11 नियम पाळा || Follow these 11 rules to look young forever (Marathi)

Описание к видео नेहमी तरुण दिसण्यासाठी फक्त हे 11 नियम पाळा || Follow these 11 rules to look young forever (Marathi)

नेहमी तरुण दिसण्यासाठी फक्त हे 11 नियम पाळा || Follow these 11 rules to look young forever (Marathi)

नेहमी तरुण दिसावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात, केस पांढरे होऊ लागतात आणि म्हातारपणाची लक्षणे स्पष्टपणे दिसू लागतात. अशा वेळी नेहमी तरुण दिसण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या 11 टिप्स आज आपण पाहणार आहोत.

अनेक जण वाढतं वय लपवण्यासाठी ब्युटी पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंट घेतात. परंतु त्यांचा म्हणावा तितका उपयोग होत नाही आणि सोबत पैसेही खर्च होतात. आपल्या दैनंदिन जीवनात काही मोजके बदल केल्यास आपण नक्की चिरतरुण दिसू. चला तर जाणून घेऊ नेहमी तरुण दिसण्यासाठी कोणत्या टिप्स आचरणात आणाव्या?

1. सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने न करता ग्रीन टी, ब्लॅक टी, हळदीचे दूध, गूळ आणि दूध, बदाम दूध अशा तारुण्य टिकवणाऱ्या आरोग्यदायी पेयांनी करा. हे पदार्थ आपल्या स्किनसाठी अत्यंत फायदेशीर असतात. रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ते सकाळी प्यायल्यास तारुण्य टिकून राहते. आठ ते दहा बदाम रात्री भिजवून ते सकाळी खाल्ल्याने देखील चेहरा तरुण दिसतो.

2. भरपूर पाणी पिणे आणि आहारात द्रव पदार्थांचा समावेश करणे : होय, तुम्ही दिवसभरात किमान दोन ते तीन लिटर पाणी अवश्य प्यायला हवे. यामुळे पचनक्रिया सुरळीत चालते. आहारातील पोषक घटक शरीरात शोषले जातात. शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते म्हणजेच शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि तारुण्य टिकून राहते.

3. मोसमी भाज्या आणि फळे आहारात अवश्य असायला हवीत. भाज्यांमुळे शरीरात अल्कलाइन घटक वाढतात, जे वाढलेलं वय कमी करतात. भाज्यांमधील खनिजे शरीराला चिरतरुण ठेवतात. फळे निवडताना लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारी फळे निवडा. फळे देखील म्हातारपण लवकर येऊ देत नाहीत.

4. तुमच्या आहारात बेकरीचे पदार्थ, पॅकेज फूड, कार्बोनेटेड ड्रिंक्स, बिस्किटे, सॉस, आईस्क्रीम, रेडी टू इट पदार्थ भरपूर असतात का? जर असतील तर त्यांचं प्रमाण अगदी नगण्य करायला हवं. कारण हे सर्व पदार्थ आपल्याला वेगाने म्हातारपणाकडे घेऊन जातात.

5. तारुण्याचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे साखर! आपलं वय वाढवण्यामध्ये सर्वाधिक वाटा या साखरेचाच असतो. चॉकलेट, पेस्ट्री, आईस्क्रीम, डेझर्ट, मानवनिर्मित कोणतेही गोड पदार्थ आरोग्यासाठी हानीकारकच असतात. यांच्यात साखर अतिप्रमाणात असते.

6. नेहमी तरुण दिसण्यासाठी आपल्या आहारात गुड फॅट्स असायलाच हवेत. ओमेगा 3 फॅट्स, मोनोसॅच्युरेटेड फॅट्स यांना गुड फॅट्स असे म्हणतात. स्वयंपाक करताना मोहरीचे तेल, तिळाचे तेल, शेंगदाणा तेल, ऑलिव्ह ऑइल यांचा वापर आवर्जून करावा. प्रयत्न करावा की कोल्ड प्रेस ऑईल आपण वापरत आहोत. हे गुड फॅट्स मनुष्याला चिरतरुण ठेवतात.

7. गाल, मान आणि डोळ्यांच्या आसपासची त्वचा वाढत्या वयासोबत लटकू लागते, सैल बनते. अशी सैल त्वचा म्हातारपण स्पष्टपणे दाखवते. जर आपण दररोज मानेचा व्यायाम केला अर्थात नेक एक्झरसाइज केली तर स्किन टाईट बनते आणि आपण तरुण दिसू लागतो. मानेच्या व्यायामासोबतच इतरही व्यायाम अवश्य करावे.

8. विटामिन ई, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असणारी फळे आवर्जून खा. जसे की संत्री, मोसंबी, बेरी ही फळे आपल्याला चिरतरुण ठेवतात. योगा म्हणजेच योगासने, वॉक, डान्स असा कोणत्याही स्वरूपाचा शारीरिक व्यायाम दररोज करायलाच हवा. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित चालते आणि त्वचा उजळते.

9. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर केलेला मेकअप स्वच्छ करावा. मेकअप रात्रभर राहिल्याने त्वचा खराब होते. रात्रभर ठेवलेला मेकअप चेहऱ्यावर पिंपल्स आणि पुटकुळ्या आणतो.

10. महिलांनी झोपताना केस बांधूनच झोपावे. मोकळे केस सोडून झोपल्याने ते तुटण्याची, गळण्याची, खराब होण्याची शक्यता वाढते.

11. चिरतरून दिसण्यासाठी शांत झोप अत्यंत आवश्यक मानली जाते. दररोज किमान सहा ते आठ तासांची शांत झोप तरुण दिसण्यासाठी महत्त्वाची असते. सातत्याने जागरण केल्याने वय लवकर वाढते, तसेच हृदयाशी संबंधित आजार देखील होतात.

12. अनेकांना धूम्रपान करण्याची सवय असते. धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहेच परंतु धुम्रपान करणारी व्यक्ती वयापेक्षा जास्त लवकर वयस्कर दिसू लागते. धुम्रपानामुळे त्वचेच्या पेशी खराब होतात.

13. रेड वाईन अवश्य घ्या : वृद्धत्व रोखण्यासाठी रेड वाइन रामबाण मानली जाते. रेड वाइन मध्ये अँटीऑक्सिडंट मुबलक असतात, जे त्वचेमध्ये कोल्याजन वाढवून चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ देत नाहीत. चेहरा तरुण तेजस्वी दिसतो.

14. भारतात उपवासाला खाल्ली जाणारी रताळी बीटा कॅरोटीन नावाच्या अँटिऑक्सिडेंट ने पुरेपूर असतात. रताळी खाल्ल्याने त्वचा तरुण दिसते. रताळ्यामध्ये आढळणारी विटामिन सी आणि विटामिन ई त्वचेचे फ्री रॅडिकल्स पासून रक्षण करतात.

15. लाल सिमला मिरची त्वचेवरील सुरकुत्या कमी करते, त्वचेवर ग्लो आणते. बदाम अक्रोड शेंगदाणे हे सुके मेवे डॅमेज झालेल्या त्वचेच्या उतींना बरे करतात तसेच त्वचेचे सूर्याच्या यु व्हि किरणांपासून रक्षण करतात.

16. पपईमध्ये पपाईन नावाचे एंजाइम आढळते. हे अँटी एजिंग म्हणून काम करते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. पपईमध्ये सूज म्हणजेच दाह कमी करणारे औषधी गुणधर्म आहेत. पपई खाल्ल्याने डेड स्कीन निघून जाते, त्वचेवर ग्लो येतो.

17. सैल त्वचा घट्ट करण्यासाठी म्हणजेच टाईट करण्यासाठी पालक, मेथी, माठ, चाकवत यासारख्या पालेभाज्या आवर्जून खाव्यात. यामुळे सुरकुत्या कमी होतात.

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद!

Комментарии

Информация по комментариям в разработке