Gurav Kranti Geet | उठ गुरवा| Utha Gurava|काशीबा महाराज गुरव | Kashiba Maharaj Gurav| Ravindra,Pooja

Описание к видео Gurav Kranti Geet | उठ गुरवा| Utha Gurava|काशीबा महाराज गुरव | Kashiba Maharaj Gurav| Ravindra,Pooja

संत काशीबा महाराज गुरव यांच्या आशिर्वादाने गुरव समाजात क्रांती घडवून आणणारे व समाजाची माहीती सांगणारे पाहिले गुरव क्रांती गीत आपल्या भेटीला आले आहे

नक्की शेअर करा Subscribe करा आणि खाली कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया आम्हाला द्यायला विसरू नाही

फोन नं - 9420922156

Gurav Kranti Geet | गुरव क्रांती गीत |

Singer: Ravindra khomne , Pooja Kale, Prachiti Hasegaonkar
Lyrics : Mangal Kale, Rushabh Kulkarni
Music Arrangement : Niranjan Bhalerao
Percussion:- Shubham kendre
Mixing and Mastering : Rushikesh Dharmadhikari
Video Editing : Swapnil Khandalkar

#जयगुरव #उठगुरवाजागाहोआता #काशीबामहाराजगुरव #RavindraKhomne

गाण्याचे शब्द:-

उठ गुरवा, उठ गुरवा .. जागा हो आता..
फुलमाळ जोडणारा..तू, धागा हो आता ..||

मतभेद टाळ सारे..हो एकजूट आता..
पडणार कधी नाही आपसांत फूट आता..||
पेटव संघर्षाने नवक्रांतीच्या ज्वाला..
मानवमुक्तीचा घे.. तू ध्यास मनी आता ।।

भक्त शिवाचा तू बेल नित्य वाहतो..
अन्याय तुझ्यावरती गावात जरी होतो..
मिळतील शिक्षणाने तुजला नव्या वाटा..||
उठ गुरवा, उठ गुरवा .. जागा हो आता..

आर्थिक घडी अपुली जर असेल तुटपुंजी..
सामूहिक करू सारे सणवार लग्न मुंजी..
एकोप्याने राहुन ऐकू साऱ्या हाका..||
उठ गुरवा, उठ गुरवा .. जागा हो आता..

भक्तीमळा सावताचा राखतो काशीबा..
ओळ ओळ परमार्थाची मांडतो काशीबा..
संतकृपेच्या छायेत.. तरेल जीवनगाथा ..||
उठ गुरवा, उठ गुरवा .. जागा हो आता...

Комментарии

Информация по комментариям в разработке