शेतीला शाश्वततेकडे नेण्यासाठी विषमुक्त नैसर्गिक शेती हाच उपाय| पुणे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | 12 मार्च 2023
50:30 - फार्मर कप कार्यक्रमानिमित्त आमिर खान आणि टीमचे मनापासून अभिनंदन!
एखादी गोष्ट सुरु करणे सोपे, पण सातत्याने सुरू ठेवणे कठीण असते. त्यामुळे जे सातत्य आमिर खान यांनी दाखविले, त्यासाठी त्यांचे अभिनंदन! 'वॉटर कप'च्या माध्यमातून जलस्वयंपूर्ण गाव तयार करणे, विषमुक्त शेती तसेच शेतकऱ्यांचे गट तयार करणे, ही कामे त्यांनी हाती घेतली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर ज्या समस्या आहेत, त्यांची सोडवणूक कशी करता येईल, यासंदर्भातील एक उत्कृष्ट मॉडेल पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून तयार झाले.
53:05 - वॉटर कप आणि शेतकरी
मागील काळात सुरू झालेली जलयुक्त शिवार योजना ही शेतकऱ्यांची योजना झाली होती. 20,000 गावांमध्ये गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी 6 लाख स्ट्रक्चर्स तयार केले, त्यातून जलस्वयंपूर्ण गावांची निर्मिती! त्यालाच जोड म्हणून वॉटर कपची सुरुवात.
55:15 - विषमुक्त नैसर्गिक शेती
गटांच्या माध्यमातून दुसऱ्या फेजमध्ये विषमुक्त शेतीकडे वाटचाल. आज वातावरणातील बदलामुळे शेतीसमोर प्रचंड आव्हान. गेले तीन वर्ष अतिवृष्टी, शेतकरी पिकवतो आणि अचानक पाऊस येतो. कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टीला सामोरे जावे लागते. या सगळ्या फेऱ्यातून बाहेर यायचे असल्यास शाश्वत शेतीशिवाय पर्याय नाही. शेतीला शाश्वततेकडे न्यायचे असेल तर विषमुक्त नैसर्गिक शेती हाच उपाय. उत्पादकता वाढविण्यासाठी जमिनीचा पोत सुधारणे गरजेचा. हे विषमुक्त शेतीच्या माध्यमातूनच शक्य.
56:31 - भारताची अवस्था हळूहळू कॅन्सर कॅपिटल होण्याकडे!
पूर्वी कॅन्सर कोणाकडे तरी दिसायचा. आज दर चौथ्या-पाचव्या घरी कोणीतरी कॅन्सरने ग्रासित असल्याची अवस्था. आपल्याला नैसर्गिक शेतीकडे वाटचाल करणे गरजेचे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रामध्ये विषमुक्त नैसर्गिक शेती मिशन सुरु. 25 लाख हेक्टर शेती नैसर्गिक शेतीकडे वळवणार, त्याकरता मोठे नियोजन. जवळपास 3,000 कोटी रूपयांचा खर्च करणार. नैसर्गिक शेतीमध्ये देशी गाई तसेच त्यांच्या गोमूत्र, शेण, शेणखत यातून तयार होणार्या मिश्रणाचा फार मोठा वाटा.
58:57 - महाअर्थसंकल्प आणि शेतकरी
या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेऊन अनेक योजना सुरु करण्यात आल्या. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु. शेतकऱ्याला गरजेच्या वेळी मदत व्हावी म्हणून पंतप्रधानांनी 'PM किसान' योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला, आता महायुती सरकारने 'नमो शेतकरी' योजना सुरु केली, ज्याद्वारे केंद्राच्या 6,000 रुपयांसोबत राज्य सरकारही 6,000 रुपये 1 कोटी 12 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार. शेतकऱ्यांना विमा भरण्याची आवश्यकता नाही, केवळ 1 रुपया भरुन त्यांना विम्याचे रजिस्ट्रेशन करता येईल आणि त्यांना विमा मिळेल. शेततळ्यासोबत अस्तरीकरण, ड्रीप, पेरणीयंत्र अशा सगळ्या गोष्टी देणार, त्यासाठी 1,000 कोटी रुपये.
01:01:24 - नव्याने गटशेतीची योजना सुरु करणार!
गटशेतीशिवाय शेतकर्यांना पर्याय नाही. शेती छोटी झाल्यामुळे शेतीमध्ये आधुनिकता आणण्याची ताकद शेतकर्यांमध्ये उरली नाही. प्रत्येक गटाला 1 कोटी रुपयांपर्यंतची मदत. शेती क्षेत्रामध्ये कौशल्य प्रशिक्षण सुरु करण्यात आले.
01:03:22 - शेतकर्यांना 12 तास वीज मिळावी यासाठी सोलर फिडर.
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळालीच पाहिजे. यावर्षी 30% फिडर सोलरवर आणण्याकरता कार्यक्रम हाती घेण्यात आला. हे फिडर सोलरवर आल्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळणार. ज्याठिकाणी शेतीमध्ये फारसे काही पिकत नसेल आणि फिडर जवळ शेती असेल, तर त्यांची शेतजमिन 30 वर्ष भाड्याने घ्यायला राज्य सरकार तयार. वर्षाला 75,000 रुपये भाडे देणार असून, त्यामध्ये दरवर्षी 2% वाढ करणार. 30 वर्षे त्या शेतीचा वापर सोलरकरता करणार आणि 30 वर्षांनी शेतकर्यांची शेती त्यांना परत करणार.
1:06:00 - जल संधारणाचे काम हाती घेणे गरजेचे
हे अल निनोचे वर्ष असेल, असे सांगितले जाते. अशी परिस्थिती निर्माण झाली तर अडचण होऊ शकते. जी गावे जलसमृद्ध झाली आहेत, त्या गावांनी आपले स्ट्रक्चर्स पुन्हा तयार करायचे आहेत.
01:07:11- 40,000 शेतकर्यांची संख्या 4 लाखांवर गेली पाहिजे, त्यासाठी राज्य शासन पाठीशी!
कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, याची तयारी करायची आहे. यासाठी शासन संपूर्ण ताकदीने शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहील, असा विश्वास!
#Pune #Maharashtra
#देवेंद्रफडणवीस #Devendrafadnavis
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis
Информация по комментариям в разработке