23 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ कोरस सहित - Sampurn Haripath - 23 Min

Описание к видео 23 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ कोरस सहित - Sampurn Haripath - 23 Min

विजया एकादशी विशेष संपूर्ण पारंपरिक हरिपाठ - , लिरिक्स सहीत 23 मिनटे
Sampurna Haripath Lyrical 23 min.

#Haripath #Lyrics #marathi #ekadashi

॥ जय जय राम कृष्ण हरि ॥ (1)
सुंदर ते ध्यान उभा विटेवरी । कर कटेवरी ठेवोनिया ॥1॥
तुळसीहार गळा कासे पीतांबर ।आवडे निरंतर हेची ध्यान ॥2॥
मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥3॥
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख । पाहिन श्रीमुख आवडेनी ॥
(2)
देवाचिये द्वारि उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारि साधिलेल्या॥1॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोणकरी॥2॥
असोनी संसारी जीव्हा वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्य सदा॥3॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी॥4॥
(3)
चहु वेदी जाण षट्शास्त्री कारण । अठराही पुराण हरिसीगाती॥1॥
मथुंनी नवनीता तैसे घे अनंता । वाया व्यर्थ कथा सांडीमार्ग॥2॥
एक हरि आत्मा जीवशिव सम । न घाली मन॥3॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे॥4॥
(4)
त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरिपाठ ॥1॥
सगुण निर्गुण गुणांचे अगुण । हरिवीण मन व्यर्थ जाय ॥2॥
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जेथुनी चराचर हरिसी भजे॥3॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी । अनंत जन्मोनी पुण्य होय॥4॥
(5)
भावेविण भक्ती भक्तीवीण मुक्ती । बळेवीण शक्ती बोलु नये ॥1॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसीवाया॥2॥
सायासे करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कवण्यागुणे॥3॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तटेल धरणे प्रपंचाचे ॥4॥
(6)
योगयागविधी येणे नोहे सिध्दी । वायाची उपाधि दंभ धर्म ।।1।।
भावेविण दैवत नकळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ।।2।।
तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांगे ।।3।।
ज्ञानदेव सांगे दृष्टांरताची मात । साधुचे संगती तरणोपाय ।।4।।
(7)
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला । ठायीच मुराला अनुभव ।।1।।
कापुराच्या वाती उजळल्या ज्योति । ठाचीय समाप्ती झाली जैसी ।।2।।
मोक्षरेख आला भाग्ये विनटला । साधुचा अंकीला हरिभक्त ।।3।।
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जेनी । हरि दिसे जनी वनी आत्मतत्वी ।।4।।
(8)
पर्वताप्रमाणे पातक करणे । वज्रलेप होणे अभक्तांसी ।।1।।
नाही ज्यासी भक्ति ते पतीत अभक्तं । हरिसी न भजत दैवहत ।।2।।
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्या कैचा दयाळ पावे हरी ।।3।।
ज्ञानदेवा प्रमाणे आत्मात हा निधान । सर्वांघटी पूर्ण एकनांदे ।।4।।
(9)
संताचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे ।।1।।
रामकृष्णं वाचा भाव हा जीवाचा । आत्मा तो शिवाचा रामजप ।।2।।
एक तत्वण नाम साधिती साधन । द्वेताचे बंधन न बाधिजे ।।3।।
नामामृत गोडी वैष्णसवा लाधली । योगिया साधली जीवनकळा ।।4।।
सत्वर उच्चा्र प्रल्हादी बिंबला । उध्द।वा लाधला कृष्ण जाता जाता ।।5।।
ज्ञानदेव म्हवणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ।।6।।
(10)
विष्णुविण जप व्यर्थ त्या्चे ज्ञान । रामकृष्णी मन नाही ज्याचे ।।1।।
उपजोनी करंटा नेणे अद्वेत वाटा ।रामकृष्णी पैठा कैसा होय ।।2।।
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैसे किर्तन घडेल नामी ।।3।।
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ।।4।।
।। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ।।
(11) त्रिवेणी संगमी नाना तिर्थे भ्रमी । चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ।।1।।
नामासी विन्मुणख तो नर पापीया । हरीविण धावया न पावे कोणी ।।2।।
पुराण प्रसिध्दी बोलीले वाल्मीके । नामे तीन्ही लोक उध्दरती ।।3।।
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे । परंपरा त्याचे कुळ शुध्द ।।4।।
(12)
हरिउच्चारीणी अनंत पापराशी । जातील लयाशी क्षणमात्रे ।।1।।
तृण अग्नीचमेळे समजरस झाले । तैसे नामे केले जपता हरी ।।2।।
हरी उच्चाचरण मंत्र पै अगाध । पळे भूत बाधा भेणे तेथे ।।3।।
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदा ।।4।।
(13)
तिर्थव्रत नेम भावेवीण सिध्दी । वायाची उपाधी करीसी जना ।।1।।
भावबळे आकळे एरवी नाकळे । करतळी आवळे तैसा हरि ।।2।।
पारियाचा रवा घेता भूमीवरी । यज्ञ परोपरी साधन तैसे ।।3।।
ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण । दिधले संपूर्ण माझे हाती ।।4।।
(14)
समाधी हरीची समसुखेवीण । न साधेल जाण द्वेतबुध्दी ।।1।।
बुध्दीचे वैभव अन्य नाही दुजे । एका केशवराजे सकळ सिध्दी ।।2।।
ऋध्दी सिध्दी निधी अवघीच उपाधी । जव त्या परमानंदी मन नाही ।।3।।
ज्ञानदेवी रम्य रमले समाधान । हरीचे चिंतन सर्वकाळ ।।4।।
(15)
नित्य सत्य् मित हरिपाठ ज्याशी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी। ।।1।।
रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप । पापाचे कळप पळती पुढे ।।2।।
हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तया मोक्ष ।।3।।
ज्ञानदेव पाठ नारायण नाम । पावीजे उत्तम निजस्थान ।।4।।
(16)
एक नाम हरि द्वेत नाम दुरी । अद्वेत कुसरी विरळा जाणे ।।1।।
समबुध्दी घेता समान श्रीहरी । शम दमा वैरी हरी झाला ।।2।।
सर्वाघटी राम देहादेही एक। सुर्य प्रकाशक सहस्त्री रश्मी ।।3।।
ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा । मागीलीया जन्मा मुक्ती झालो ।।4।।
(17)
हरिबुध्दी जपे तो नर दुर्लभ । वाचेशी सुलभ रामकृष्ण ।।1।।
रामकृष्ण नामी उन्मनी साधली । तयाशी लाधली सकळ सिध्दी। ।।2।।
सिध्दी बुध्दी धर्म हरिपाठी आले । प्रपंच निवाले साधुसंगे ।।3।।
ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा । येणे दश दिशा आत्मा्राम ।।4।।

Haripath
Sant Eknath Maharaj
Bhakti (devotion)
Marathi devotional songs
Hindu spirituality
Religious hymns
Sant Eknath Abhang
Bhakti sangeet (devotional music)
Marathi literature
Hindu saints

#Haripath
#SantEknathMaharaj
#BhaktiSongs
#DevotionalMusic
#HinduSpirituality
#MarathiCulture
#ReligiousHymns
#SantEknathAbhang
#Bhajan
#MarathiBhaktiGeet
@Marathi_Hripath

Комментарии

Информация по комментариям в разработке