थंडीमध्ये शरीराला उष्णता देणारे मेथीचे लाडू. प्रमाणबद्ध / लाडू अशा पद्धतीने केले तर कडू होणार नाहीत

Описание к видео थंडीमध्ये शरीराला उष्णता देणारे मेथीचे लाडू. प्रमाणबद्ध / लाडू अशा पद्धतीने केले तर कडू होणार नाहीत

साहित्य -
मेथी - अर्धा कप 100 ग्रॅम
तूप - 1 कप
दूध - 1 कप 250 ml
बदाम - 1/2 कप 70 ग्रॅम
काजू - 1/2 कप 70 ग्रॅम
पिस्ता - पाव कप 50 ग्रॅम
अक्रोड - पाव कप 50 ग्रॅम
चारोळी - 2 चमचे
खसखस - 2 चमचे
खोबरे - 2 कप 100 ग्रॅम
गव्हाचे पीठ - 1-1/2 कप 170 ग्रॅम
डिंक - 1/2 कप 100 ग्रॅम
सुंठ पावडर - 1 चमचा
वेलची पावडर - 1 चमचा
गूळ - 2 कप - 350 ग्रॅम
पाणी - 2 ते 3 चमचे
-------------------------------------
कृती -
प्रथम कडे मध्ये अर्धा कप मेथी हलकी भाजून घ्या. थंड झाले की मिक्सरमध्ये रवाळ दळून घ्या, त्यात एक कप दूध टाकून चार तास भिजत ठेवा.दुसऱ्या बाजूला कढईमध्ये दोन चमचे तूप टाका व त्यामध्ये अर्धा कप बदामाचे तुकडे आणि काजूचे तुकडे भाजून घ्या. पाव कप पिस्ता आणि अक्रोड भाजून घ्या व दोन चमचे चारोळी भाजून घ्या दोन कप खोबरे खमंग भाजून घ्या दीड कप गव्हाचे पीठ खमंग तूप टाकून भाजून घ्या तीन मोठे चमचे तूप टाकून त्यात अर्धा कप डिंक तळून घ्या पुन्हा कढईमध्ये अर्धा कप तूप टाका व त्यात चार तास भिजवलेली मेथी मंद आचेवर 17 ते 18 मिनिट भाजून घ्या. भाजून घेतलेले खोबरे ड्रायफ्रूट्स डिंक हे सगळे सेपरेट मिक्सरमध्ये बारीक करून घ्या व त्यानंतर मेथी थंड झाली की मिक्सर मधून बारीक करून घ्या. सगळे साहित्य एकत्र करून त्यावर दोन चमचे खसखस एक चमचा सुंठ पावडर आणि वेलची पावडर टाकून एकजीव करा.350 ग्रॅम गूळ घ्या, त्यात दोन ते तीन चमचे पाणी टाकून वितळून घ्या व त्यावर एक चमचा तूप टाका. पाक केलेल्या सारणा मध्ये टाकून एकजीव करा. व लाडू वळून घ्या.

-------------------------------------
Ingredients -

Fenugreek half cup / 100 gm
Ghee 1 cup
Milk 1 cup / 250 ml
Almonds 1/2 cup / 70 gms
Cashews 1/2 cup / 70 gms
Pistachio pav cup / 50 gm
Walnut pav cup / 50 gm
Charoli 2 tbsp
Poppy seeds 2 tbsp
Coconut 2 cups / 100 gm
Wheat flour 11/2 cups / 170 g
gum 1/2 cup / 100 g
cinnamon powder 1 tsp
Cardamom powder 1 tbsp
Jaggery 2 cups / 350 gm
Water 2 to 3 tbsp

-------------------------------------
Recipe -
First lightly roast half a cup of fenugreek seeds. After it cools down, grind rawal in a mixer, add one cup of milk and keep it soaked for four hours.On the other side, add two spoons of ghee in a pan and fry half a cup of almond pieces and cashew nuts in it. Roast half a cup of pistachios and walnuts and roast two tablespoons of charoli. Roast the fenugreek on low flame for 17 to 18 minutes. Grind all the roasted coconut dry fruits gum in a separate mixer and after that once the fenugreek cools down grind it in the mixer. Combine all the ingredients and add two teaspoons of poppy seeds, one teaspoon of cinnamon powder and cardamom powder.
Take 350 grams jaggery, melt it by adding two to three spoons of water and add one spoon of ghee. Put in the cooked saran and stir. And turn the ladle.

Комментарии

Информация по комментариям в разработке