झुंजाररावांचा वाडा|Zunjarrao wada|नेवाळपाडा,

Описание к видео झुंजाररावांचा वाडा|Zunjarrao wada|नेवाळपाडा,

गेल्या शतकात कल्याणच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या ठळक व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे शंकरराव झुंजारराव. या ऐतिहासिक शहराचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. आता महापालिकेचे मुख्यालय ज्या ठिकाणी आहे, तो शंकरराव चौक त्यांच्याच नावाने ओळखला जातो. शिवाजी चौक परिसरातील भाजी मंडईसुद्धा झुंजारराव मार्केट म्हणून ओळखली जाते. झुंजारराव कुटुंबीयांचे मूळ गाव मुरबाडमध्ये आहे. तेथील नेवाळपाडा येथील १८ व्या शतकातील भव्य वाडा त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत अजूनही उभा आहे.
#झुंजारराव वाडा,कल्याणहून मुरबाडच्या दिशेने प्रस्थान केल्यानंतर मुरबाड, सरळगाव अशी अनुक्रमे गावे पार करीत तब्बल ४५ किलोमीटर अंतर पार केल्यानंतर आपण ‘नेवाळपाडा’ परिसरात येऊन पोहोचतो. कल्याण ते नेवाळपाडा अंतर कापण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ चा वापर करावा लागतो. इतर रस्त्यांच्या तुलनेत हा उत्तम दर्जाचा रस्ता चटकन नजरेत भरतो. त्यावरून प्रवास करताना अजिबात थकवा जाणवत नाही. नेवाळपाडा परिसरात पोहोचल्यानंतर एक भव्य वाडा आपल्या नजरेस पडतो. आजुबाजूला असलेल्या आधुनिक बंगल्यांच्या गर्तेत सापडलेला हा १८ व्या शतकातील भव्य वाडा आपल्याला मोहून टाकल्याखेरीज राहात नाही. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांमध्ये आपले बहुमूल्य योगदान देणाऱ्या झुंजारराव कुटुंबाचा हा वाडा आहे. कल्याणचे पहिलेवहिले नगराध्यक्ष दिवंगत शंकरराव झुंजारराव यांचा हा वाडा आहे.
मुरबाड तालुक्यातील काजगाव, संगमेश्वर, मौजे-नागाव, मौजे-खुटल, सरळगाव आदी गावांतील महसूल गोळा करण्याचा अधिकार झुंजारराव कुटुंबीयांकडे होता. महसूल व्यवहाराचा सर्व कारभार या वाडय़ातून चालत असे. भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई ठाण्याचे जिल्हाधिकारी असताना मुरबाड तालुक्यात महसूल गोळा करण्यासाठी येत असत. या काळात नेवाळपाडय़ातील या झुंजारराव वाडय़ात त्यांचा मुक्काम असे.
#शंकरराव चौक
#झुंजारराव वाडा#Wada,Moraraji Desai,Murbaad,Murbad,Thane,Newalpada,Shankarrao Jhunjhar,वाडा,मुरबाड,ठाणे,शंकरराव झुंझार,नेवाळपाडा,ऐतिहासिक वास्तू#Old#इतिहास#History,Kalyan#Jhunjhara Market#शंकरराव चौक#झुंजारराव कुटुंबीयांचे मूळ गाव#महापालिकेचे मुख्यालय#Latest Marathi News, #भारताचे #माजी पंतप्रधान मोरारजी देसाई #ठाण्याचे जिल्हाधिकारी#माजी पंतप्रधान मोरारजी देसाई,Murbad Taluka is settled in the natural depression of the Sahyadri Hills.,Malshej Ghat
Badlapur

Комментарии

Информация по комментариям в разработке