मला स्वतःला बनवायला आणि लोकांना खाऊ घालायला अतिशय आवडतं त्यामुळे मी सतत नविन प्रयोग करत असते त्यातले सफल झालेले प्रयोग☺️. बदल्यांमुळे महाराष्ट्रातल्या मराठवाडा, विदर्भ, प. महाराष्ट्र, कोकण, आणि खानदेश येथील वास्तव्यात शिकलेल्या तिथल्या पारंपरिक, वैशिष्टपूर्ण आणि वेगळ्या पाककृती,
तसेच माझी भावंडे परदेशात स्थायिक आहेत तिथल्या काही आवडलेल्या पाककृती , विविध प्रांतातल्या मित्र मैत्रिणीकडून शिकलेल्या त्यांच्या वेगळ्या पाककृती ,डायट रेसिपिज्, आई, आज्जी, मावशी, आत्या बनवत असलेले सर्वांच्या आवडीचे पदार्थ, तसेच विस्मृतीत गेलेल्या पाककृती इ.इ. या सर्व प्रकारच्या पाककृती घेऊन मी यु ट्युब वर येत आहे.. तुम्हाला सगळ्यांना आवडतील अशी आशा व्यक्त करते धन्यवाद
मयुरा