मालवणचो आठवडा अपना बाजार कष्टकऱ्यांचो आधार!घरगुती उत्पादन!मळ्यातले हिरवे धन! हेच जगण्याचे साधन!🐠🐓🥬🥭🥒

Описание к видео मालवणचो आठवडा अपना बाजार कष्टकऱ्यांचो आधार!घरगुती उत्पादन!मळ्यातले हिरवे धन! हेच जगण्याचे साधन!🐠🐓🥬🥭🥒

कोकण किनारपट्टीवर वसलेले मालवण शहर एक निसर्गरम्य ऐतिहासिक शहर! छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही मालवणची भूमी त्याचप्रमाणे संस्कृतीचा वारसा जपणारे असे हे सुंदर शहर. अलीकडेच मालवण शहराचा पर्यटन दृष्ट्या भरपूर विकास झाला आहे. मालवण तालुक्यामध्ये असलेली आंगणेवाडीची भराडी देवीची यात्रा आज जगभर प्रसिद्ध आहे. मालवण तालुक्यात असलेले तारकर्ली बीच देवबाग बीच चिवला बीच तोंडवली बीच आचरा बीच या ठिकाणी देश परदेशातून बरेच पर्यटक येतात. मालवण शहराच्या समुद्रात असलेला जलदुर्ग म्हणजेच सिंधुदुर्ग हा शिवरायांच्या आरमारी शौर्याची आठवण करून देणारा केला म्हणून प्रचलित आहे.
या मालवण शहरांमध्ये सकाळ व संध्याकाळ रोज माशांचा लिलाव बाजार भरतो. दर सोमवारी मोठा आठवडा बाजार भरतो. या आठवडा बाजार मध्ये पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी आपल्या शेतात पिकवलेल्या भाज्या कडधान्य वेगवेगळ्या प्रकारची फळे या बाजारामध्ये विकायला घेऊन येतात. या बाजाराला कष्टकऱ्यांचा बाजार म्हणूनही ओळखला जातो. म्हणूनच या बाजाराचं नाव अपना बाजार असं पडलं आहे.
कष्टकरी शेतकऱ्यांच्या व्यापार या मालवणच्या सोमवारी भरणाऱ्या आठवड्या बाजारामध्ये कसा होतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
हा कष्टकऱ्यांचा व्हिडिओ आपणास नक्कीच आवडेल व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे youtube चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती🙏
धन्यवाद🚩 जय हिंद 🇮🇳

Комментарии

Информация по комментариям в разработке