Delhi मधल्या Rau's IAS Coaching Classes मध्ये 3 UPSC विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय घडलं ?

Описание к видео Delhi मधल्या Rau's IAS Coaching Classes मध्ये 3 UPSC विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय घडलं ?

#BolBhidu #DelhiCoachingFlood #ShreyaYadav

दिल्लीच्या old राजेंद्र नगर भागात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे राऊ आयएएस स्टडी सर्कलच्या इमारतीच्या तळघरात पाणी आल्याने नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या तीन यूपीएससी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 1 विद्यार्थी आणि 2 विद्यार्थिनींचा समावेश आहे. तिन्ही मृतांची ओळख पटली आहे. या दुःखद घटनेमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी यूपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा निषेध करत अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. श्रेया यादव, तान्या सोनी, नेविन डेल्विन असे या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

या भीषण अपघातप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कोचिंग सेंटरचा मालक आणि समन्वयकाला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी बीएनएसच्या कलम १०५, १०६ (१), ११५ (२), २९० आणि ३५ अंतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा खटला कोचिंग इन्स्टिट्यूट आणि इमारतीचे व्यवस्थापन आणि त्या ठिकाणच्या नाल्याच्या देखभालीची जबाबदारी असलेल्यांविरुद्ध आहे. संपूर्ण विषय समजून घेऊया ह्या व्हिडिओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке