Pune To Shegaon I Via Shirdi Samruddhi Mahamarg I पुणे ते शेगाव I शिर्डी समृद्धि महामार्गावरून I

Описание к видео Pune To Shegaon I Via Shirdi Samruddhi Mahamarg I पुणे ते शेगाव I शिर्डी समृद्धि महामार्गावरून I

नमस्कार मित्रांनो..
आज ऐक नवीन प्रवासासाठी निघलो आहे आणि आज ह्या प्रवासात माझ्या सोबत आहेत माझे मित्र हेमंत, राजाभाऊ आणि चंद्रा अण्णा
आम्ही चौघे मिळून हमंतच्या गाडीतून आज निघालो आहोत ते शिर्डी साईबाबा मंदिरात श्री साई बाबांच्या दर्शनासाठी आणि तिथून पुढे समृद्धी महामार्गांवरून पुढे शेगांव का जाणार आहोत ते श्री गजानन महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी
आणि त्यासाठीं आज सकाळी लवकर उठून आम्ही सगळे मित्र जमा होत राजाभाऊंच्या घरापाशी, आणि आमचा प्रवास सुरु झाला तो शिर्डी च्या दिशेने
सकाळी ६:३० ल पुणे सोडले तसे अम्ह् साधारण ७:४५ क्या सुमारास राजगुरुनगर क्या पुढे असलेल्या खेड च घाट चडून वर आलो आणि तीठेबदव्या बाजूला असलेल्या हॉटेल आकाश ल थांबलो ते breakfast करण्या साठी
प्रत्येकाची ऑर्डर दिली आणि थोड्याच वेळात breakfast पण आला आता सगळ्यांनी पोटभर नाष्टा केला आणि तिथून आम्ही साधारण ८:३० च्या सुमारास पुढे शिर्डी च्या दिशेने निघालो..पुढे संगमनेर ओलांडून आम्ही शिरडी विमानतळ जवळून शिर्डी शहरात दाखल झालो तोपर्यंत १०:४५ झाले होते..
आज मंदिरात जाण्यासाठी हेमंत ने आमच्या सर्वाचा मिळून एक पास काढला होता त्यामुळे आम्हाला खूप लवकर मंदिरात जायला मिळाले..आणि खूप सुंदर असे श्री साई बाबांच्या दर्शनाचा लाभ मिळाला..
मंदिरात खूप छान दर्शन झाले आणि मग आम्ही गुरुस्थानी जाऊन नमस्कार केला आणि तिथून पुढे चावडीवर डोके ठेऊन पुढे द्वारकामाई मधे जाऊन धूनी ला नमस्कार केला ,बाबांना नमस्कार केला आणि ते झाल्यावर आम्ही आमची गाडी जिथे लावली होती त्या ठिकाणी आलो

मित्रानो आता इथुन आम्ही थेट समृद्धि महामार्ग गाठला इथे मात्र राजाभाऊंना महामार्ग बघून स्वतः गाडी चालवायची इच्छा झाली आणि त्यांनी मला तसे सांगितले
मी ह्या पूर्वी बऱ्याचवेळा ह्या महामार्गावरून गाडी चालवत प्रवास केला आहे त्यामुळे मला जेव्हा राजाभाऊंनी गाडी चालवायची इच्छा व्यक्त केली तेव्हा मलाच जास्त आनंद झाला त्यांच्या हातात गाडी देताना

आता आमचा प्रवास सुरू झाला होता समृद्धी महामार्गावरून आणि त्यात राजाभाऊ गाडी चालवत असल्यामुळे तर अजूनच जास्त आनंद होत होता त्यांना आणि आम्हाला सगळ्यांना, कारण इथे आपल्याला गाडीचा वेग हा तशी १२० किलोमीटर प्रती तास ह्या वेगाने गाडी चालवता येते हा आनंद जास्त असतो तसेच हे अत्यंत जबाबदारीचे काम आहे जे राजाभाऊंना व्यवस्थित जमते
महामार्गावरील ऐका पेट्रोलपंप वर आम्ही थांबलो आणि इथे गाडीचे चारही चाकात नायट्रोजन हवा भरली ( just to be on the safer side)

मित्रांनी इथुन आमचा प्रवास सुरु झाला तो मेहेकर च्या दिशेने, शिर्डी ते मेहकर हे साधारण ३:३० ते ४ तासांचे अंतर आहे महामार्गावरून त्यामुळे आम्ही मेहेकार च्या अलीकडे असलेल्या एका पेट्रोल पंप वर दुपारी साधारण २:३०/२:४५ च्या सुमारास पोहोचलो आणि तिथे असलेल्या हॉटेल मध्ये ठीदे हलके असे खाणे केले .आणि मग इथुन पुढे निघालो ते मेहकर एक्झीट जवळ
आम्ही मेहकर एक्झीट गाठले तोपर्यंत दीलुपरचे साधारण ४ वाजले होते आणि इथे आपण समृद्धि महामार्ग सोडून राज्य महामार्गावर प्रवासाला सर्वात करतो
राज्य महामार्ग पण खूप छान आहे आणि ह्या मधे बऱ्याच ठिकाणी सिमेंट काँक्रिट चेवरस्ते आहेत तर उर्वरित भागात सुंदर आणि खड्डे विरहित डांबरी रस्ते आहेत त्यामुळे आमचा प्रवास ह्या रस्त्यांवरून सुद्धा खूप छान सुरू झाला होता
वाटेत आज बऱ्याच वेळा खूप गरम होत होते ..ते ही गाडीत एसी सुरू असतं देखील बाहेरचा हा उन्हाचा कडाका जाणवत होता आणि पुढे गेल्यावर अचानक पावसाळा सर्वात झाली होती
सुरवातीला आम्हाला वाटले होते की थोडा पाऊस पडेल पण तसे न होता आता जोराचा वरा आणि त्याच सोबत जोराचा पाऊस सुरू झाला होता..एका क्षणी तर पाऊस इतका जोरात होता की आम्हाला समोरचे काहीच दिसत नव्हते आणि गाडी कुठे तरी तंबवावी की काय असा विचार आला होते..
तरी पण आम्ही आमचा प्रवास सुरूच ठेवला आणि पुढे गेलो
वाटेत काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती आणि वाटेत ठीक ठिकाणी झाडांच्या फांद्या पण पडलेल्या दिसत होत्या आणि पुढे एके ठिकाणी तर संपूर्ण झाडाचं रस्त्यावर आडवे झालेले दिसले ..पण आमचे नशीब जोरात होते त्यामूळेच आमच्या पुढे असलेल्या गाडीचालकाने खाली उतरून त्या झाडाच्या काही फांद्या तोडल्या आणि ऐक गाडी जाऊ शकेल इतकी जागा केली जेणेकरून आमची गाडी त्या जागेतून सुखरुप बाहेर पडली .
आम्ही पुढे निघालो तसे वाटते पाऊस जोरात येत होता वारे पण जोरात वाहत होते तरी आम्ही पुढे जात होतो, थोड्या वेळात आम्ही बाळापूर चौकात आलो
इथुन आता साधारण ३५/४० किलोमीटर वर शेगांव आहे..त्यामुळे आम्हाला पण बरे वाटत होते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इथे पाऊस थांबला होता आणि हवेत ऐक चांन गारवा आला होते
थोड्याच वेळात आम्ही शेगांव येथील आनंदसागर भकनिवासात दाखल झालो होतो.
मित्रानो हे भक्तनिवास आणि पुढील भाग पाहण्यासाठी माझा vlog शेवटपर्यंत पहावा ही विनंती
धन्यवाद
.

#पुणेतेशेगांव #पुणेतेशिर्डी #पुणेतेसंगमनेर #पुणेनाशिकमहामार्ग #पुणेतेराजगुरुनगर #खेडराजगुरुनगर #खेडमंचर #पुणेतेनारायणगाव #पुणेतेजुन्नर #पुणेतेआळेफाटा #पुणेतेकोपरगाव #समृद्धिमहामार्ग #हिंदूहृदयसम्राटबालासाहेबठाकरेसमृद्धिमहामार्ग #समृद्धीहायवे #समृध्दीमहामार्ग #शिरडीतेशेगांव #शिर्डीतेशेगाव #शिर्डीतेऔरंगाबाद #शिरडीतेजालना #शिर्डीतेमेहेकर #शिर्डीतेमेहकर #शिर्डीनागपूरसमृध्दीमहामार्ग #पुणेशिर्डीशेगांव #punetoshirdi #punetoshegaon #punetosangamner #punenashikhighway #punetorajgurunagar #khedrajgurunagar #khedmanchar #mancharalephata #punetonarayangaon #punetojunnar #punetoalephata #punetokopargaon #punetoshegaonviasamruddhimahamarg #punetoshegaonviasamrudhihighway #hinduhridayssmratbalasahebthakresamruddhimahamarg #samruddhimahamarg #samruddhihighway #shirditoshegaon #shirditoaurangabad #shirditojalna #shirditomehekar #shirdinagpurhighway #puneshirdishegaonbycar

Комментарии

Информация по комментариям в разработке