इथे जायची वेगळीच उत्सुकता असते 😍 | केळशी बाजारपेठ Kelshi Bajarpeth - Dapoli (Konkan)

Описание к видео इथे जायची वेगळीच उत्सुकता असते 😍 | केळशी बाजारपेठ Kelshi Bajarpeth - Dapoli (Konkan)

इथे जायची वेगळीच उत्सुकता असते 😍 | केळशी बाजारपेठ Kelshi Bajarpeth - Dapoli (Konkan) माझ्या गावचे केळशी हे मुख्य बाजारपेठ आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आमच्या गावातील माणसे बाजारासाठी केळशी येथे जातात. आम्ही केळशी बाजारपेठेत जायला निघतो तेव्हा घरातून निघताना एक वेगळीच उत्सुकता असते. केळशी हे दापोली तालुक्यातील बाजारपेठेचे ठिकाण आहे. केळशीमध्ये पर्यटकांना पाहण्यासाठी बरेच काही आहे. या केळशी गावाला मोठा इतिहास आहे. माझे गाव मंडणगड तालुक्यातील आंबवली हे गाव आहे. हे गाव भारजा नदीच्या किनारी वसलेले आहे. आम्हाला बाजार आणायचा असेल तर केळशी येथेच जावे लागते. सकाळी लवकर उठून तयारी सुरू होते. न्याहारी करून आम्ही केळशी जाण्यासाठी तयार होतो. पूर्वी महिला केळशी येथे बाजाराला जाताना टोपल्या नेत असत आता लोकं पिशव्या नेतात. आमच्या गावापासून केळशी हे गाव 3 ते 4 किमी अंतरावर वसलेलं आहे. #KelshiBajarpeth #KelshiDapoli #AmbavaliToKelshi #sforsatish
आम्हाला भारजा नदीची खाडी पार करावी लागते. तिथे होडीवाला आपल्याला पलीकडे सोडतो. तिथून एसटी किंवा रिक्षाने आम्ही केळशीमध्ये पोहोचतो. काही ठराविक किराणा दुकाने आहेत तिथे खरेदी केली जाते. चिमन, मिसाळ यांच्या हॉटेलात नाश्ता होतो. दोन चार वडापाव पार्सल घेतले जातात. केळशी मासळी बाजारात म्हावरा असेल तर तो सुद्धा आम्ही खरेदी करतो. प्राथमिक उपचारासाठी केळशी हेच आमचे ठिकाण आहे. आमच्या गावसारखे अजून बरीच गावे आहेत तिथून माणसे बाजारासाठी केळशी येथे येतात. लहानपणी मी आईसोबत खास हट्ट करून जायचो. खूप मोठं शहर बघून आल्याचं समाधान आम्हाला असायचं. अगोटच्या बाजार खरेदीसाठी लोकं केळशी येथे जातात तेव्हा पावसाळ्यासाठी दोन ते तीन महिन्यांच्या किराणा एकदाच खरेदी करतात. पूर्वी आम्ही केळशी ते माझं गाव आंबवली पर्यंत होडीने प्रवास करत असू. मागे केळशी गावच्या या बाजार खरेदीवर एक चार ओळी लिहिल्या होत्या.

केळशी ❤️

सकाळच्या न्हारीला नाचणीची भाकरी
आणि सोबत खोबऱ्या-लसणाची चटणी
तोंडाला लावायला कोलबाची सुकटा खाल्ली
की, निघालो आम्ही टोपली घेऊन केळशी बाजाराला

आम्हा केळशी हेच मुख्य बाजारपेठ
पावसाअगोदर अगोटच्या सामानापासून
ते प्रत्येक सणासुदीच्या खरेदीपर्यंत
सारे काही आम्हा इथेच मिळे केळशीमध्ये

आंबवली ते केळशी असा प्रवास असे
भारजा नदी ओलांडून खाजनाच्या किनाऱ्याने
रस्ता तुडवत आम्ही पोहचत असू बोरिवलीत
जिथे बारमाही थंडगार पाणी, सावली मिळे

पुढचा प्रवास सुखकर असे कारण
केळशीत पोहचुन खरेदीची उत्सुकता असे
दांड्याच्या वडाशी पोहचतो ना पोहचतो
कातळावरच्या सुकत घातलेल्या म्हावऱ्याचा वास
स्वागताला कावळ्यांची सभा मात्र मोठ्या आवाजात असे

बाजारपेठेत जाताच इतर गावातील माणसे
हमखास भेटत ज्यांच्याशी गप्पाही होत
नेहमी ठरलेल्या दुकानात खरेदी करून
येताना मात्र दालदोडी जावे लागे
दुपारी बोटी येत असत ताजा म्हावरा तिथेच मिळे

पुन्हा तोच रस्ता कापत
डोक्यावर सामानाची टोपली
घराची ओढ, रखरखत्या उन्हात
झपाझप पावले टाकत आम्ही घरी येत असू

अश्या केळशी गावाशी माझ्या बऱ्याच आठवणी जुळलेल्या आहेत, ज्या मी आयुष्यभर विसरू शकत नाही ! ❤️

व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.

तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Комментарии

Информация по комментариям в разработке