मेहनत केल्यावर हे फळ मिळतं 😍 | माझं कोकणचं गाव Ambavali - Mandangad (Konkan)

Описание к видео मेहनत केल्यावर हे फळ मिळतं 😍 | माझं कोकणचं गाव Ambavali - Mandangad (Konkan)

मेहनत केल्यावर हे फळ मिळतं 😍 | माझं कोकणचं गाव Ambavali - Mandangad (Konkan) मी माझ्या कोकणातील गावी आहे. माझं गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात आंबवली हे आहे. सध्या गावी शेतीची कामे जोरात सुरू आहेत. शेतं भातं कापून भात झोडायचे काम जोरात सुरू आहेत. भात झोडताना उन्हात त्रास होऊ नये म्हणून सकाळी लवकर उठून भात झोडायला घेतात. आम्ही सुद्धा आमच्या भाताची झोडणी करण्यासाठी सकाळी लवकर उठलो होतो. आई आणि मी दोघे मिळून भात झोडणी केली. प्रदनु आणि प्रांजु दोघांना हा सगळा अनुभव नवीन होता. प्रदनु सकाळी लवकर उठून बाहेर भात झोडणी बघायला आला. सकाळी अर्धे भारे झोडुन झाल्यावर आम्ही चहा, पाणी प्यायलो. आमचा शेतकऱ्यांचा तो स्ट्रॅटेजीक टाईम असतो. शेतीच्या कामात खूप मेहनत घ्यावी लागते. पण शेवटी या सरायमध्ये मेहनतीचं फळ मिळतं. #MehanatichaFal #KonkanVillage #AmbavaliMandangad #sforsatish
शेतीची कामे आम्ही वर्षभर करत असतो. सरायमध्ये भात आमच्या घरात येतो पण त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. कवल तोडणे, भाजवणी, साखलनी, पेरणी आणि लावणी सोबत छोटी मोठी बरीच कामे असतात. दुपारी आमच्या गावी मासळी विक्री करण्यासाठी महिला केळशी येथून येतात. आम्ही मांदेली मासळी घेतली. भाताचे काम संपल्यावर आम्ही आमच्या भारजा नदीच्या खाडीत कोलंबी पकडण्यासाठी गेलो. आम्हाला कोलंबी चांगली मिळाली. मासे, व्हले, पुऱ्या (खेकड्याचा प्रकार) सापडले. घरी येऊन मस्त आईने सुक्या कोलंब्या घातल्या. दिवसभर काम करून थकल्यावर रात्री चांगलं जेवण बनतंच बनतं. हे सगळं गावचं सुख आहे. कोकणचं गाव तिथल्या गावच्या जमिनीत शेतीची कामे करताना एक वेगळीच मजा येते आणि समाधान मिळतं. शेवटी मेहनत केली की फळ आपल्याला मिळतं. तुम्हाला हे सगळं दाखवलं या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळं आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.

तुमचं प्रेम असंच कायम असुद्या !

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर संपर्क करा.

  / koknatlamumbaikar  
https://www.instagra..com/koknatlamumbaikar

Комментарии

Информация по комментариям в разработке