VidhanSabha Election: Supriya Sule आणि Rashmi Thackeray यांच नाव CM पदासाठी चर्चेत, मविआचा प्लॅन काय

Описание к видео VidhanSabha Election: Supriya Sule आणि Rashmi Thackeray यांच नाव CM पदासाठी चर्चेत, मविआचा प्लॅन काय

#BolBhidu #MaharashtraElection2024 #MaharashtraWomenCMNews

मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रानं अनेक राजकीय स्थित्यंतरं बघितलीत. राज्यात तीन वेगवेगळी सरकारं स्थापन झाली. एकमेकांचं तोंडही बघणं पसंत न करणारे पक्ष सत्तेत एकत्र बसल्याचं दिसलं. शिवसेना आणि राष्ट्रवादीत बंडखोरी झाली. महायुतीचं सरकार स्थापन झालं. मागच्या 6 दशकांत महाराष्ट्रात जितक्या राजकीय उलथापालथी झाल्या नसतील, तितक्या उलथापालथी अवघ्या पाच वर्षात बघायला मिळाल्या. याच उलथापालथीमुळे राज्यात प्रमुख पक्षांची सहा शकलं निर्माण झालीत. आता हे सहाही पक्ष आता विधानसभेच्या रिंगणात उतरलीत. आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, यासाठी त्या-त्या पक्षाकडून जोर लावला जातोय. विविध नावं चर्चेत येतायत. मित्र पक्षांकडूनच डाव-प्रतिडाव टाकल्याचं बघायला मिळतंय. हे सगळं सुरू असताना आता महाविकास आघाडीकडून एखाद्या महिलेला मुख्यमंत्री केलं जाईल, अशा चर्चा सुरू झाल्यात.

विधानसभेला महाविकास आघाडीला बहुमत मिळालं तर महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री दिली जाईल, असं देखील बोललं जातंय. याबाबतचं सूचक वक्तव्य काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केलंय. त्यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीकडून महिला मुख्यमंत्री कोण असतील, याबाबत तर्क वितर्क लढवले जातायत. त्यांनी नेमकं काय म्हटलं? महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदासाठी कोण दावेदार असू शकतात. महिला मुख्यमंत्री पदाचा डाव खेळून महायुतीला कसं डॅमेज केलं जाऊ शकतं? पाहुयात या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке