Vidhan Saba निवडणुकीत Pune Congress ला BJP च्या ताकदीपेक्षा कॉंग्रेसमधलाच अंतर्गत संघर्ष जड जाणार ?

Описание к видео Vidhan Saba निवडणुकीत Pune Congress ला BJP च्या ताकदीपेक्षा कॉंग्रेसमधलाच अंतर्गत संघर्ष जड जाणार ?

#BolBhidu #PuneCongress #PuneVidhanSabha

पुण्याचे सध्याचे खासदार भाजपचे, पुण्याच्या महानगरपालिकेची मागची निवडणूक जिंकली भाजपने, पुणे शहरातल्या ८ विधानसभा मतदारसंघांपैकी ५ आमदार भाजपचे, थोडक्यात पुण्याच्या राजकारणावर होल्ड आहे तो भाजपचा. असाच होल्ड कधीकाळी काँग्रेसचा होता, म्हणजे पुण्याचे पहिले खासदार, पुण्याचे पहिले महापौर काँग्रेस पक्षातून आलेले. पण त्यानंतरही महानगरपालिका असेल किंवा विधानसभा, काँग्रेसचा पंजा पुण्यात चालायचा. पुणे हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा, पण २०१४ पासून ही परिस्थिती पूर्णपणे बदलली. लोकसभा आणि महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला यश मिळालं नाहीच, पण २०१४ आणि २०१९ च्या विधानसभेला काँग्रेसची पाटी पुणे शहरात कोरीच राहिली.

काँग्रेसला रिव्हायव्हल देणाऱ्या रवींद्र धंगेकरांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलं, पण भाजपनं आपला गड कायम राखला. विजयी झालेल्या मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देऊन त्यांची ताकद वाढवण्यात आली, तर काँग्रेसला अंतर्गत गटबाजीचा फटका बसला, असं बोललं जाऊ लागलं. त्यामुळं आता काँग्रेसचं लक्ष आहे विधानसभा निवडणुकांवर. पण त्यांच्यापुढं आव्हान जसं पुण्यात पाय घट्ट रोवलेल्या भाजपचं आहे, तसं जागावाटपात मित्रपक्षांकडून जागा मिळवण्याचं आणि मिळणाऱ्या, हक्काच्या वाटणाऱ्या जागांवर अंतर्गत संघर्ष रोखण्याचं. हा अंतर्गत संघर्ष काँग्रेसला कसा जड जाऊ शकतो ? कोणत्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे ? आणि हा संघर्ष कुणाच्या पथ्यावर पडू शकतो ? पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке