Official Video.बाळ परसु आला मला गं मुराळी, कशी येऊ आंबा तुझ्या रावळी.

Описание к видео Official Video.बाळ परसु आला मला गं मुराळी, कशी येऊ आंबा तुझ्या रावळी.

गायिका :- निताताई देवकुळे

गीतकार :- शाहीर बापू पवार

संगीत :- निलेश देवकुळे

कीबोर्ड :-ओंकार धुमाळ

साईट रिदम :- साई धुमाळ.

निर्माता :- श्रीकांत क्षीरसागर, सुमितकुमार देवकुळे.

कोरस :- गौतम देवकुळे, अविनाश, लखन क्षीरसागर, निलेश देवकुळे.

संकल्पना :- लखन क्षीरसागर.

स्वरस्नेह रेकॉर्डिंग स्टुडिओ, कुर्डुवाडी.
लखन क्षीरसागर.

व्हिडीओ :- लखन क्षीरसागर

विशेष सहकार्य :- साई मल्टीमीडिया, सतीश गायकवाड कुर्डुवाडी.

शुक्राचार्य चौघुले.

स्वरस्नेह रेकॉर्डिंग स्टुडिओ टीम.



बाळ परसु आला मला ग मुरळी,
कशी येऊ सांग आंबा तुझ्या रावळी // धृ //


माळ कवड्याची कशी तुटली ग बया,
कोण करेल सांग माझ्या आंबे ची माया
काय घालू गळ्यात सकाळी सकाळी //१//


बाण लाटायला आज मी टाकला
लय गं लबाड माझा दीर घाकला
नाही बाई ल्याले मळवट कपाळी //२ //


परडी कुठे ठेवली विसरले बाई
चुडा माझ्या हातामध्ये भरला नाही
अंगावरची फाटली या साडीचोळी //३//


काय सांगू कुणाला या संसाराची रीत
अंबाबाईनं घडलया माझं एवढं हित
बापू माझ्या बांधवाला तूच सांभाळी //४//

Комментарии

Информация по комментариям в разработке