Olympics 2024: Jordan Chiles चं मेडल काढून Romania च्या Ana Barbosu ला बहाल, Vinesh चं काय होणार ?

Описание к видео Olympics 2024: Jordan Chiles चं मेडल काढून Romania च्या Ana Barbosu ला बहाल, Vinesh चं काय होणार ?

#BolBhidu #ParisOlympics2024 #VineshPhogat

५ ऑगस्ट २०२४ ला ऑलिंपिक्समध्ये जिम्नॅस्टिकच्या फ्लोअर एक्सरसाईजचा मेडल इव्हेन्ट पार पडला. ज्यात ब्रॉन्झ मेडल मिळालं अमेरिकेच्या जॉर्डन चिलीजला. वयाच्या २३ व्या वर्षी ऑलिम्पिक मेडल मिळवलेल्या जॉर्डन चिलीजचं कौतुक व्हायला लागलं आणि साधारण रविवारी ११ ऑगस्टला बातमी आली, जॉर्डन चिलीजचं ब्रॉन्झ मेडल काढून रोमानियाच्या खेळाडूला बहाल, CAS कोर्टाचा निर्णय. भारतीय चाहत्यांचे कान या बातमीमुळं टवकारले गेले, याचं कारण म्हणजे मेडल काढून दुसऱ्या खेळाडूला देण्याचा निर्णय हा CAS कोर्टाचा होता. याच CAS कोर्टामध्ये भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्याबद्दलचा निर्णय पेंडिंग आहे.

वजन १०० ग्रॅम जास्त भरल्यामुळं अपात्र ठरलेल्या विनेशनं आपल्याला जॉईंट सिल्व्हर मेडल देण्यात यावं अशी मागणी केली आहे, तिच्या प्रकरणाबद्दलचा युक्तिवाद पार पडला असून अंतिम सुनावणी होणं बाकी आहे. त्यामुळं जर CAS कोर्ट मेडल मिळालेल्या खेळाडूचं मेडल काढून दुसऱ्या खेळाडूला देऊ शकतं, तर विनेशबाबत हा न्याय लागू होणार का ? असा प्रश्न आता विचारला जातोय. पण चिलीजसोबत नेमकं काय घडलं ? तिच्या मेडलचा विषय कोर्टात कशामुळं गेला ? चिलीजच्या मेडल विरोधात अपील करणाऱ्या रोमानियाच्या बाजूनं निकाल लागला, तसाच विनेशच्या बाबतीत लागेल का ? सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке