Vijay Phalnikar |Founder Apla Ghar |Karmaveer talks |अनाथ, वृध्दांसाठी आपलं घर |कर्मवीर विजय फळणीकर

Описание к видео Vijay Phalnikar |Founder Apla Ghar |Karmaveer talks |अनाथ, वृध्दांसाठी आपलं घर |कर्मवीर विजय फळणीकर

मुलाच्या अकाली निधनानंतर फळणीकर दाम्पत्य जीवन संपवायला निघाले होते. तेच आता म्हणतात ईश्वरा मला शंभर वर्षे काम करू दे बरं का ? निराधार, अनाथ आणि वृध्दांसाठी बांधलं " आपलं घर "
श्री विजय फळणीकर, संचालक अध्यक्ष आपलं घर, यांचा झपाटून टाकणारा प्रवास त्यांच्याच शब्दात..
मुलाखतकार- मृदुला जोशी पुरंदरे #MrudulaJoshiPurandare #MarathiGlobalVillage

विजय फळणीकरांच्या ‘आपलं घर’मध्ये अनंक आजी-आजोबा आणि मुलं राहतात. अनाथांचा नाथ बनलेल्या सेवादानाच्या या सत्पात्री दानाविषयी..
‘पराजय नव्हे विजय!’ विजय फळणीकर नावाच्या अनाथांच्या नाथाचे हे आत्मकथन. मी सहज म्हणून पुस्तक चाळायला घेतलं आणि त्यात इतकी गुंतले की वाचून झाल्याक्षणी मी फळणीकरांना फोन केला आणि मुलाखतीची वेळ ठरवली.
विजय फळणीकर यांचं आयुष्य ही देवाची देणगी आहे असे वाटते.
समृद्धीच्या पायऱ्या चढत असताना एकुलत्या एक मुलाच्या आकस्मिक निधनाने आलेलं कमालीचं नैराश्य आणि त्यातून स्फुरलेली अनाथ मुलांचा बाप होण्याची प्रेरणा.. या साऱ्याच घटना सामान्य माणसाच्या आकलनापलीकडच्या आहेत.
उपेक्षितांच्या जगण्यासाठी धडपडणारा फळणीकरांचा ‘आपलं घर’ हा प्रकल्प पुण्यात वारजे व डोणजे अशा दोन ठिकाणी समर्थपणे उभा आहे. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण परिसर त्यांनी कमालीचा स्वच्छ राखलाय. इथल्या मुलांची आनंदी व निरोगी देहबोली पाहून यांना अनाथ म्हणून कमनशिबी म्हणावं की इथे राहतात म्हणून भाग्यवान, असा मला प्रश्न पडला! केवळ तिथे राहणाऱ्यांनाच नव्हे तर भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला आपलंसं वाटावं असंच हे ‘आपलं घर’ आहे.

विचार फळणीकरांनी आपल्या मित्रांजवळ संस्थेचा विचार बोलून दाखवताच तेरा जणांच्या विश्वस्त मंडळाची स्थापना झाली आणि ‘स्व. वैभव फळणीकर मेमोरिअल फाऊंडेशन’ हा ट्रस्ट आकाराला आला (एप्रिल २००२). फळणीकरांचे मित्र पं. सुरेश वाडकर यांनी आपला ‘सुरमयी शाम’ हा कार्यक्रम पुण्यात आयोजित करून ट्रस्टला सव्वापाच लाख रुपये मिळवून दिले आणि सुसज्ज रुग्णवाहिकेद्वारे कामाला सुरुवात झाली.

फळणीकरांचं नि:स्पृह काम बघून अनेक दाते ‘आपलं घर’ संस्थेशी जोडले गेले आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर हे संस्थेचे एक ट्रस्टी आहेत. त्यांच्या मनाचा मोठेपणा व संस्थेशी जुळलेली नाळ इतळी घट्ट की एवढय़ा व्यस्त दिनक्रमातूनही महिन्याच्या बैठकीला ते आवर्जून हजर असतात. तेही वेळेच्या पाच मिनिटं आधीच. संवेदनशील अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हीसुद्धा ‘आपलं घर’ची मानद संचालक आहे. गेली १२ वर्षे ‘आपलं घर’मधील गणपतीची पहिल्या दिवसाची आरती मृणाल कुलकर्णीच्या हस्ते होतेय.

चांगल्या घरातील मुलांना जे जे मिळतं ते ते आपल्या मुलांना देण्याचा फळणीकरांचा प्रयत्न असतो.इथल्या आजी-आजोबांनीही ‘स्वप्न स्वरांचे, नव तारुण्यांचे’ या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने ही झगमगती दुनिया बघितली. फळणीकर म्हणतात, ‘अशा कार्यक्रमांना समाजच पैसा देतो, मी फक्त नियोजन करतो एवढंच.’

या देवकार्यासाठी फळणीकरांना अनेक पुरस्कार मिळाले. यातील एक पुरस्कार कायम स्मरणात राहील असे ते म्हणतात. २००४ मध्ये सुनील गावस्कर यांच्या हस्ते त्यांचा गौरव केला गेला. तो क्षण अविस्मरणीय होता. ‘‘या पुरस्कारावर जरी माझं नाव असलं तरी त्यात ‘जेथे राघव तेथे सीता’ हे ब्रीदवाक्य मानून चालणारी माझी पत्नी साधना आणि ‘आपलं घर’च्या सर्व परिवाराचा मोलाचा वाटा आहे,’’ हे त्यांचे उद्गारही पुरेसे बोलके आहेत.

हसत हसत फळणीकर म्हणाले, ‘तेव्हाही भीक मागायचो, आत्ताही मागतोय. फक्त उद्देश वेगळा एवढंच.’ सरकारची कुठलीही मदत नाही, परंतु समाजाच्या चांगुलपणावर त्यांचा विश्वास आहे. हा विश्वास सार्थ ठरवणं ही आता समाजाची जबाबदारी.

आपलं घर- मदत करायची असल्यास संपर्क करा.
www.apalaghar.com
[email protected]


#AplaGhar #Orphan Children #Old age home #Orphanage #happyness #MotivationalSpeech #SocialWorker #YajurvendraMahajanSirSpeech #Inspiring story #Influencer #SocialOrganisation #MaharashtraSocialWorker
#MarathiGlobalVillage #मराठी #म #Global #marathi #Journalist #Anchor #Global #NewsAnchor #India #Canada #Books #Writer #Subscribe #जगाच्यापाठीवर #AroundTheWorld
#EnglishSpeakers #Indians #Social Worker

for more Information Please Visit our Social handles …
Follow-
http://marathiglobalvillage.com/

Global Marathi village family Facebook page -

  / 155417112578797  

#Subsribe-

https://www.youtube.com/c/GlobalMarat...


If you like the concept to watch all our videos, please like it, Subscribe and share this to non Marathi friends worldwide, and click on the bell icon to get all notifications.

Комментарии

Информация по комментариям в разработке