महिलांनीकलश यात्रेतसहभागी होतांनाआपआपल्या कलशामध्ये पवित्र व शुद्धपाणीच भरावे-आनंद माळी,लक्ष्मण माळी

Описание к видео महिलांनीकलश यात्रेतसहभागी होतांनाआपआपल्या कलशामध्ये पवित्र व शुद्धपाणीच भरावे-आनंद माळी,लक्ष्मण माळी

नंदुरबार येथील श्रीस्वामी समर्थ केंद्रनजीक असलेल्या नंदुरबार नगरपालिकेच्या जुन्या उद्यानात, शिवधाम बनविण्यासाठी नियोजित जागेसंदर्भात नंदुरबार पालिकेचे माजी नगरसेवक आनंद माळी, तसेच सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माळी यांनी पत्रकार परिषद आयोजित करून नंदुरबार शहरवासीयांना 26 ऑगस्ट रोजी स्थापित होणाऱ्या कार्यक्रमाच्या शुद्ध जल कलशात भरून आणण्याचे आवाहन केले आहे. नंदुरबार येथील श्री स्वामी समर्थ केंद्र नजीक असलेल्या उद्यान याची जागा नंदुरबार शहरातीलच एका शहा परिवाराने 1947 साली उद्यान बनवुन लहान मुले, वृद्ध महिलांच्या सोयीसाठी नगर परिषदेला दान केले होते, त्याठिकाणी जमिन दान देणाऱ्या शहा परिवाराचा एक पुतळाही बसविण्यात आला होता, अलिकडे तो हटविण्यात आला असला तरी, शिवधामचे काम पूर्ण झाल्यानंतर तो पुतळा त्या जागेवर परत बसवावा जेणेकरुन ही जागा दान देणाऱ्याचे स्मरण कायमस्वरुपी लक्षात राहील, अशी मागणी पालिकेचे माजी नगरसेवक आनंद माळी व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माळी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केले आहे, त्यानंतर नगर परिषदेत रवींद्र परदेशी नगराध्यक्ष असतांना या जागेवर गार्डनचे आरक्षण हटवुन, तेथे 100 दुकानांचे शॉपिंगचे आरक्षण टाकण्यात आले, या विरोधात कल्पना ईश्चर धामणे यांनी 1995-96 साली हायकोर्टात जनहित याचिका टाकली, या याचिकेत ज्या उद्देशाने शहा परिवाराने जागा नगरपरिषदेला दान दिली होती, त्या उद्देशाला बाधा पोहचत असल्याचा दावा केला गेला, ही याचिका कोर्टाने मान्य करीत निकाल रघुवंशी म्हणजे नगर परिषदेच्या विरोधात गेला व या जागेवर शॉपिंग बनवता येणार नाही, व जागेवर गार्डनच बनवावे लागेल असा निकाल कोटनि दिला, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मनातले शॉपिंग बनणार नाही कोर्ट ऑडरमुळे नाईलाजास्तव तिथे, गार्डनरुपी शिवधाम बनविण्याचे श्रेय घेण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे धडपड करीत आहेत, वास्तविक या जागेवर गार्डन रुपी जागेवर शिवधाम बनविण्याचे खरे श्रेय ही जागा नगर परिषदेला दान देणाऱ्या शाह परिवाराचे, व याचिकाकर्त्या सौ धामणे यांचेच म्हणावे लागेल, या शिवधाम ठिकाणी बसविण्यात येणारी मूर्तीची 25 ऑगस्ट रोजी भव्य शोभायात्रेत कलशधारी महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे, त्याला मनापासून शुभेच्छा व समर्थन दिले आहे, महिलांनी कलश यात्रेत सहभागी होतांना आपआपल्या कलशामध्ये पवित्र व शुद्ध पाणीच भरावे, असे आवाहन माजी नगरसेवक आनंद माळी व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माळी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केले आहे, काही दिवसाअगोदर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विरचक धरण क्षेत्रात अतिक्रमित रघुवंशी फार्म हाऊसवर, पत्रकार परिषद घेवुन या फॉर्म हाऊसमधील शौचालयाच्या सेप्टी टैंकचा निचरा हा धरणात होत असल्याचे पत्रकार परिषदेत मान्य केले, कबुल केले होते, अश्या पाण्याने महादेवाचा अभिषेक केल्याने ही महादेवाच्या मूर्तीची विटंबना या पवित्र श्रावण महिन्यात आपल्या हातुन होवु शकते, शोभायात्रेत आपल्या कलशामध्ये पाणी शुद्ध करुन अथवा शक्यतो बोरिंगचे पाणी कलशामध्ये आणावे जेणेकरुन महादेवाच्या मूर्तीची विटंबना आपल्या हातुन होणार नाही, असे आवाहन माजी नगरसेवक आनंद माळी व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माळी यांनी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमधून नागरिकांना केले आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке