Kirit Somaiya Letter : भाजपसाठी नडणारे किरीट सोमय्या थेट भाजपलाचं का भिडले ? खरं कारण वेगळंच

Описание к видео Kirit Somaiya Letter : भाजपसाठी नडणारे किरीट सोमय्या थेट भाजपलाचं का भिडले ? खरं कारण वेगळंच

#BolBhidu #kiritsomayya #devendrafadnavis

दोन-अडीच वर्षे मागं गेलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात एका नावाचा प्रचंड दरारा होता. ते नाव म्हणजे किरीट सोमय्या. किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेणार असतील, तर विरोधी पक्षातल्या अनेकांना घाम फुटायचा. किरीट सोमय्या पत्रकार परिषदेतून कुणावर आरोप करणार? काय आरोप करणार? कुणाचा घोटाळा बाहेर काढणार? असे अनेक प्रश्न पडायचे. भ्रष्टाचारी नेत्यांची कुंडली सोमय्यांकडे असते, तेच भ्रष्टाचारी नेत्यांचं भविष्य ठरवू शकतात, इथपर्यंत सोमय्यांची इमेज तयार झाली होती. त्यामुळे ज्या-ज्या वेळी सोमय्या यांचं नाव चर्चेत यायचं, तेव्हा त्यांनी कुणाचा तरी घोटाळा बाहेर काढलेला असायचा. कुणावर काहीतरी आरोप केलेले असायचे.

पण आता सोमय्या याचं नाव एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आलंय. त्यांनी टाकलेल्या 'लेटरबॉम्बसाठी.' त्यांनी आपल्याच पक्षाविरोधात हा लेटरबॉम्ब टाकलाय. आगामी निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पक्षानं निवडणूक आयोग संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी दिली होती. पण त्यांनी ही जबाबदारी स्पष्टपणे नाकारलीय. त्यांनी पत्राद्वारे ही नाराजी व्यक्त केलीय. यामुळे राज्यातलं भाजपचं नेतृत्व तोंडावर पडलंय. सोमय्या भाजप नेतृत्वाच्या विरोधात जाण्यामागं नेमकी काय कारणं असू शकतात? सोमय्यांना राज्यातल्या भाजप नेत्यांचा एवढा संताप का आलाय? सोमय्यांचा लेटरबॉम्ब भाजपचे डोळे उघडणारा आहे का? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओतून पाहूयात...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке