🌾मामांच्या(श्री.मसाल गुरुजींच्या) शेतातील पारंपारिक भात लावणी भाग १🌾Kokan Bhat Lavani🤩Rice farming

Описание к видео 🌾मामांच्या(श्री.मसाल गुरुजींच्या) शेतातील पारंपारिक भात लावणी भाग १🌾Kokan Bhat Lavani🤩Rice farming

🌾मामांच्या(श्री.मसाल गुरुजींच्या) शेतातील पारंपारिक भात लावणी🌾Kokan Bhat Lavani🤩Rice farming

पारंपारिक भात लावणी - पावसाळा सुरू झाला की रेनकोट, छत्री, पावसाळी चपला.. अशी जय्यत तयारी करून आपण स्वतःची काळजी घेतच असतो. पण एखाद्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही शेतात जाऊन पावसाची तमा न बाळगता कधी शेतात काम केलंय का? आकाशातून कोसळणारा पाऊस, गुडघ्याएवढे पाणी आणि चिखलाच्या थरात उभे राहून भात लावण्याची मजा घेतली आहे का? अनेक शहरी पर्यटक सध्या हा अनुभव घेत आहेत, तुम्हीही एकदा भात लावणीला जाऊन तर बघा…

भात लावण्यासाठी शेतकरी एवढे कष्ट घेतो, याची जाणीव म्हणुन आपण आजपासुन आणि यापुढे जेवताना ताटात भात कधीच वाया घालवणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे. हा अनुभव आपल्यासाठी मौल्यवान आहे.
पावसाळा सुरू झाला, की शहरी पर्यटकांना जसे धबधबे आणि निसर्ग पर्यटनाचे वेध लागतात, त्याच वेळी शेतकऱ्याकडे भात लावणीची लगबग सुरू होते. पहिल्या पावसात भाताची रोपे करायची आणि पावसाने वेग धरला, की एका दमात कुटुंबाने भातलावणी करायची, अशी परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. कामानिमित्त शहरात गेलेली मंडळी भातलावणीसाठी आवर्जून गावाला जातात, नातेवाइकही एकमेकांच्या मदतीसाठी आवर्जून दाखल होतात. शेतकऱ्यांसाठी भातलावणी हा एक स्नेहमेळावाच असतो. घरातल्या स्त्रिया सकाळी लवकर उठून सगळ्यांसाठी न्याहारी करतात. कोवळ्या उन्हातच कुटुंब शेताकडे रवाना होते. महिला दुपारचा स्वयंपाक आटोपून त्यांच्या मदतीला जातात. ऊन डोक्यावर येईपर्यंत वेगाने भातलावणी करण्याचे त्यांनी ठरवलेले असते. या वेळी मनोरंजनासाठी महिला गावाकडची जुनी पारंपरिक गाणी, ओव्या म्हणून भातलावणी करतात. पुरुष मंडळी त्यांना दाद तर देतातच; अन् कधी कधी गाण्याचीही साथ देतात. दुपारच्या जेवणानंतरही सूर्यास्तापर्यंत पुन्हा हा उपक्रम सुरू असतो.
पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या डोंगरदऱ्यांच्या कुशीत सुरू असलेली भातलावणी म्हणजे नेत्रसुखद सोहळा असतो. काही वर्षांपूर्वी शहरातील बहुतांश नागरिक वेगवेगळ्या माध्यमातून ग्रामीण भागाशी जोडले होते. त्यामुळे भातलावणीसह शेताच्या अनेक कामांना, सणांसाठी ही मंडळी गावाकडे जात असत. पण अलीकडे अनेक पिढ्या शहरातच राहिल्याने अनेकांची गावाशी असलेली नाळ तुटली आहे. छोट्या मुलांना तर शेतात पिके कशी घेतात, याची तोंडओळख पाठ्यपुस्तकातच होते. पुस्तकातील नकाशांच्या आधारेच ही मुले शेतीचे गणित शिकतात. शेतात राहण्याची, तेथे काम करण्याची माहिती त्यांना धड्यांमधून मिळते.

‘भात लावणी शिबिर’ असा नवा फंडा शेतकऱ्यांनी आणला आहे. लहान मुलांना पारंपरिक शेतीची पद्धत कळावी आणि मोठ्यांना शेतात राबविण्याचा अनुभव देता यावा, या उद्देशाने भातलावणी शिबिरे सुरू झाली आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमाला शहरी पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. फेसबुकसह इतर सोशल नेटवर्किंग साइटवरही भातलावणीचे अनुभव कथन करणारे लेख आणि फोटो फिरायला सुरुवात झाली आहे.

धबधब्यांच्या ठिकाणी झालेला पर्यटकांचा अतिरेक, पर्यटनस्थळी होणाऱ्या दारूपार्ट्या, कारमध्ये मोठमोठ्यांदा गाणी लावून, कपडे काढून नाचणाऱ्या बेशिस्त पर्यटकांमुळे कौटुंबिक पर्यटक आणि शांतताप्रिय तरुण मंडळी सध्या शांत आणि निवांत ठिकाणांच्या शोधात आहेत. त्यामुळेच या पर्यटकांसाठी भातलावणीचा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला आहे.

#suchikoo #trending #viralvideo #vlog #marathi
#ricefarming #farmer #village #farming #lavani #kokan

Комментарии

Информация по комментариям в разработке