Narmada Parikrama- Eka Navin Adhyachi suruvat I नर्मदा परिक्रमा I

Описание к видео Narmada Parikrama- Eka Navin Adhyachi suruvat I नर्मदा परिक्रमा I

नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीला उजव्या हाताला ठेऊन प्रदक्षिणा घालणे. या परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर कोणत्याही दिवशी करावी. परिक्रमा मैयाच्या शेजारील कोणत्याही ठिकाणाहून करता येते,. प्रामुख्याने ती ओमकारेश्वर येथून करतात. परंतु सांगता कुठेही झाल्यास ओमकारेश्वर येथे गेल्याशियाय सांगता होत नाही

सायकल वरून परिक्रमा कशी करावी--
सायकलवरून परिक्रमा करताना मैया शेजारील रस्त्याने करावी. रात्रीचा मुक्काम शक्यतो नर्मदा घाटावर करावा. बरेचसे cyclist स्पीडच्या नादात जास्तीत जास्त अंतर कापतात. परतू छोटे छोटे अंतर कापल्यास, वेगवेगळ्या मंदिरांची व पायी चालणाऱ्या पारीक्रमावासियांची भेट घेता येईल व आत्मिक समाधान मिळेल. मैयाच्या शेजारील क्षेत्र फार पवित्र व भारलेला आहे. अनेक ऋषीमुनींनी मैया शेजारी तपस्चर्या केली आहे. तेथील नागरिकांच्या आदरतिथ्याच्या आनंदही घेता येईल.

नर्मदा नदीचे धार्मिक महत्त्व
रामायण,महाभारत तसेच पौराणिक ग्रंथांमधे नर्मदा नदीचे वर्णन आले आहे.या नदीच्या किनारी असलेल्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने मानवाला पुण्य मिळते अशी श्रद्धा हिंदू धर्मात प्रचलित आहे. ही नदी कुमारिका स्वरूपात आहे अशी धारणा आहे.

इतिहास
मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली होती अशी धारणा आहे. मार्कंडेय ऋषींनी श्रीमार्कण्डेय मुनी हे नर्मदा-परिक्रमेचे आद्य प्रवर्तक. त्यांनी सुमारे सात हजार वर्षापूर्वी नर्मदेची परिक्रमा केली. त्या परिक्रमेचे वैशिष्ट्य असे की त्यांनी नर्मदेचीच नव्हे तर तिच्या उभय तटांवर तिला येऊन मिळणाऱ्या सुमारे ९९९ नद्यांचे धारा-प्रवाह न ओलांडता प्रत्येकीच्या उगमाला वळसा घालून मार्गक्रमण केले. अश्या पूर्णतः शास्त्रोक्त महापरिक्रमेला त्यांना ४५ वर्षे लागली !

स्कंदपुराणात नर्मदेचे वर्णन आले आहे असे म्हणतात.

पायी केल्यास ही यात्रा ३ वर्षे ३ महिने आणि तेरा दिवसात पूर्ण होते असा समज आहे. यासाठी एकूण 3200 किलोमीटर अंतर पायी चालावे लागते. आम्ही ४३ दिवसात ३६०० km अंतरकापून मैयाची परिक्रमा पूर्ण केली.

मैया म्हणजे नर्मदा नदी. परिक्रमा करणाऱ्या स्त्री ला मैया म्हणतात व पुरुषाला बाबाजी म्हणतात. कोणीही भेटल्यास "नर्मदे हर" हा परवलीचा शब्द.

पुढील माहिती माझ्या पुढे येणाऱ्या भागात आपणास दिसेल. भेटूया, माझ्या channel subscribe जरूर करा. share व comments करायला विसरू नका.

माझ्या सायकल भ्रमंती चे व्हीडीओ पाहण्यासाठी खालील link वर click करा.
‪@sanjaysawantonride‬

मला insta account वर follow करायला विसरू नका.

आपला आभारी
‪@sanjaysawantonride‬

#narmadaparikrama #narmadayatra #narmadaparikramaoncycle #narmadaparikramabyfoot
How long does it take to do Narmada Parikrama?
Is Narmada Parikrama difficult?
Why is Narmada Parikrama Done?
What is the route of Narmada Parikrama?

Комментарии

Информация по комментариям в разработке