१ रूपयात पिच्चर साईन करणारा लक्ष्या मराठीतला पहिला सुपरस्टार कसा झाला | Laxmikant Berde Biography

Описание к видео १ रूपयात पिच्चर साईन करणारा लक्ष्या मराठीतला पहिला सुपरस्टार कसा झाला | Laxmikant Berde Biography

१ रूपयात पिच्चरसाईन करणारा लक्ष्या मराठीतला पहिला सुपरस्टार कसा झाला | Laxmikant Berde Biography

मागं कधीतरी एक किस्सा वाचनात आला होता. सलमान as a लीड हिरो म्हणून मैने प्यार किया सिनेमाचं शूट करत होता. तर सिनेमाच्या शूट दरम्यान एके दिवशी नवखा सलमान खान त्याच्या मेकअप रूममध्ये फुल्ल टेन्शनमध्ये हाताची नखं खात बसला होता. आता टेन्शन कसलं तर लक्ष्मीकांत बेर्डे नावाच्या मुरलेल्या मराठी कलाकारासमोर acting करण्याचं. कारण तेव्हा त्याला कुणीतरी सांगितलं होतं की लक्ष्मीकांत बेर्डेपासून सावध राहा. तो सीनमध्ये ऑन दि स्पॉट ऍडिशन घेतो. ते ऐकल्यापासून सलमान बेक्कार नर्व्हस झाला होता. त्यानं लक्ष्मीकांत बेर्डे नावाची धास्ती खाल्ली होती. कारण तोपर्यंत लक्ष्मीकांत बेर्डे या नावापुढं मराठी फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार अशी उपाधी लागली होती. नाटकं, सिनेमा, टीव्ही सिरीयल सगळीकडं त्यांच्या नावाचा डंका वाजत होता. अन सलमानच्या नावावर केवळ 1988 साली आलेल्या बीवी हो तो ऐसी या सिनेमातल्या सहकलाकाराची भूमिका नोंद झाली होती. त्याचा अनुभव कमी होता आणि तो कमी अनुभव स्क्रीनवर दिसून येईल याची त्याला भीती वाटत होती. कारण सलमाननं आणखी एकाकडून असंही ऐकलं होतं की लक्ष्मीकांत बेर्डे नावाचा माणूस जेव्हा जेव्हा स्क्रीनवर येतो तेव्हा तेव्हा तो समोरच्या व्यक्तीरेखेला पार खाऊन टाकतो अन लोकांचं सगळं अटेंशन एकटाचं खेचून घेतो. आता एवढ्या ताकदीच्या कलाकारापुढं आपला निभाव लागेल का, त्यांच्यापुढं लोकांना आपली acting साधारण वाटेल का ? तसं झालं तर आपलं करिअर सुरु व्हायच्या आधीचं डब्यात जाईल का याची सलमानला भीती वाटत होती. त्यामुळं सलमान बेर्डेसोबत अंतर ठेवून वागत होता. पण ती गोष्ट जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कानावं पडली तेव्हा ते थेट सलमानच्या रूममध्ये गेले अन म्हणाले, तू माझ्याशी असा का वागतोयस, आपलं ट्युनिंग जुळलं नाही तर सीन व्यवस्थित शूट कसा होणार. तेवढ्यावर न थांबता त्यांनी सलमानशी हात मिळवणी केली. पुढं बोलताना विनोदी पंच काढून सलमानची घुसमट, भीती दूर केली अन त्याला सीनसाठी तयार केलं. नंतर मग लोकांना मैने प्यार किया मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आणि सलमानच्या अभिनयाची ती टॉप क्लास जुगलबंदी पाहायला मिळाली. तर एकूण असा होता आपल्या लाडक्या लक्ष्याचा अभिनय क्षेत्रातला टेरर ज्याला खुद्द बॉलिवूडचा भाईजान सुद्धा टरकून असायचा. लक्ष्या हा खऱ्या अर्थानं कॉमेडीतला बापमाणूस होता. माफ करा पण लहानपणापासून लक्ष्मीकांत बेर्डे या नावापेक्षा लक्ष्या हेच नाव जास्त जवळच आणि आपलं वाटत असल्यामुळं या व्हिडीओत त्यांचा एकेरी उल्लेख होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तरी कृपया लक्ष्या या नावामुळं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या भावना दुखावणार नाहीत अशी आशा आहे. आज आपल्या लाडक्या लक्ष्याचा जन्मदिवस म्हणजे बर्थडे हो. खरं तर लोकं आपल्यातून गेलेल्या माणसांची जयंती साजरी करतात पण लक्ष्या आपल्यातून गेलाय असं मला तरी वैयक्तिकरित्या कधी वाटलं नाही.  माझ्यासारख्या अनेकांचं बालपण समृद्ध करण्यात लक्ष्याचा मोलाचा वाटाय. त्यामुळं आजच्या या व्हिडीओमध्ये आपण लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्ष्याच्या आयुष्याचे काही इंटरेस्टिंग पैलू जाणून घेणारंय,

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari

#विषयचभारी
#laxmikantberdemovies
#laxmikantberdesongs
#laxmikantberdemarathi movie
#laxmikantberdedeath
#laxmikantberdecomedy scene
#laxmikantberdeinterview
#laxmikantberdefuneral
#laxmikantberdecomedy
#laxmikantberdefamily
#laxmikantberde
#laxmikantberdesonmovie
#laxmikantberdedeath news
#laxmikantberdeandashoksarafmarathimovie
#laxmikantberdeson

Комментарии

Информация по комментариям в разработке