महायुतीत BJP आणि Shivsena पेक्षा वेगळी भूमिका, Ajit Pawar स्वतंत्र लढणार की तिसरी आघाडी करणार ?

Описание к видео महायुतीत BJP आणि Shivsena पेक्षा वेगळी भूमिका, Ajit Pawar स्वतंत्र लढणार की तिसरी आघाडी करणार ?

#BolBhidu #AjitPawar #Mahayuti

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अथवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमी अधिक फरकाने वाऱ्यामुळे दुर्घटना घडली, जबाबदारी नौदलाची होती अशी विधानं केली. ही विधानं कुठेतरी जबाबदारी झटकणारी होती अशा चर्चा झाल्या, मात्र याच वेळी अजित पवारांनी या दुर्घटनेवरून महाराष्ट्राची जाहीर माफी मागतो अस विधान केलं. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजप अशा तीन पक्षांची युती म्हणजे महायुती. मात्र महायुतीतले दोन पक्ष म्हणजेच भाजप आणि शिवसेना वेगळा स्टॅण्ड घेतायत आणि अजित पवार थेट चुक कबूल करत माफी मागतायत. बर प्रकरण इतक्यावरच थांबल नाही तर दूसऱ्या दिवशी अजित पवार गटाने पुतळा कोसळण्याच्या प्रकरणावरून निदर्शने देखील केली.

या घटना घडतायत तोच अजून एक बातमी आली. शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी अजित पवार तिसरी आघाडी उभारतली ती देखील दिल्लीच्या सल्ल्याने अशा आशयाचं विधान केलं. लगोलग अजित पवार 60 जागा लढवतील अशी बातमी अजित पवारांच्याच भाषणाचा संदर्भ देवून समोर आली. एकीकडे महायुतीतल्याच भाजप शिवसेनेला विरोध ठरेल अशी भूमिका घेणं, 60 जागांची चर्चा स्वत:हून अजित पवारांनी करणं, त्याच्याच घराण्यातून अजित पवार तिसरी आघाडी करतील अस विधान चर्चेत येणं..आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर तानाजी सावंत यांच्यासारख्या नेत्याने राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसावं लागतं असल्याने बाहेर आल्यानंतर उलटी होते अस विधान करणं. या गोष्टी एका दिशेने बोट करतायत ते म्हणजे अजित पवार स्वतंत्र लढतील का? झालीच तर तिसरी आघाडी किंवा थेट स्वतंत्र लढण्याची भूमिका अजित पवार घेतील का? की लोकसभेप्रमाणे कमी जागा घेवून अजित पवार शांत राहतील समजून घेवूया या व्हिडिओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке