Maharashtra Assembly Elections: हवा कुणाच्या बाजुने ? सर्व्हे आणि AI च्या opinion poll चे अंदाज काय?

Описание к видео Maharashtra Assembly Elections: हवा कुणाच्या बाजुने ? सर्व्हे आणि AI च्या opinion poll चे अंदाज काय?

#BolBhidu #MahayutivsMVA #MaharashtraVidhansabhaElections

केंद्रीय निवडणूक आयोगानं शुक्रवारी जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यातील निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं. या दोन राज्यांसोबत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका देखील होतील, असं बोललं जात होतं. पण तसं झालं नाही. निवडणूक आयोगानं महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहेत. पुढच्या काही दिवसांत गणेशोत्सव, नवरात्री आणि पितृपक्ष असे विविध सण येणार आहेत. त्यामुळे १५ ते २० दिवस निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. निवडणुकीच्या तारखा पुढे ढकलल्याने आता महायुती आणि महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप होतायत. युतीला प्रचाराला आणखी वेळ मिळावा, म्हणून निवडणुका पुढे ढकलल्याची टीका संजय राऊतांनी केलीय. असं असलं तरी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रचाराचं रणसिंग फुंकण्यात आलंय. दोन्ही बाजुने जोरदार प्रचार केला जातोय. अशात आता महाराष्ट्र विधानसभेचा अंदाज सांगणारे ओपिनियन पोल समोर आले आहेत.

टाइम्स नाऊ-MATRIZE आणि झीनिया एआयचा सर्व्हे नुकताच प्रसिद्ध झालाय. या सर्व्हेनुसार विधानसभेला धक्कादायक निकाल लागण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजुने हवा असल्याचं दिसून आलं. पण विधानसभेला ही हवा फिरू शकते, असा अंदाज सर्व्हेतून व्यक्त करण्यात आलाय. टाइम्स नाऊ-MATRIZE आणि झीनिया एआयच्या सर्व्हेत नक्की काय म्हटलंय? आता निवडणुका झाल्या तर राज्यात कुणाची सत्ता येईल? कुणाला किती जागा मिळू शकतात? सर्व्हेचे अंदाज काय सांगतात? पाहुयात या व्हिडीओतून

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке