६३० कोटींचा चेक परत करणारे shegaon चे Shivshankar Bhau Patil | Bol Bhidu | Shegaon | Gajanan Maharaj

Описание к видео ६३० कोटींचा चेक परत करणारे shegaon चे Shivshankar Bhau Patil | Bol Bhidu | Shegaon | Gajanan Maharaj

#BolBhidu #Shegaon #shivshankarBhau#GajananMaharaj #शिवशंकरभाऊ

मुळचे बुलढाण्याचे असणारे विक्रम पंडित सिटी बॅंकेचे चेअरमन झाले. त्यांनी शेगावच्या गजाजन महाराज ट्रस्टला मदत करण्याचं नियोजित केलं. त्यासाठी त्यांनी तब्बल ७०० कोटींचा चेक विश्वस्त मंडळाकडे सुपूर्त केला. विश्वस्त मंडळाने आलेल्या पैशातून काम पूर्ण केलं आणि राहिलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले…

ही परत करण्यात आलेली रक्कम होती ६३० कोटी रुपये.

तब्बल ६३० कोटी रुपयांचा चेक परत करणारे व्यक्ती म्हणजे शेगावच्या गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील. आज शिवशंकर भाऊ पाटील यांच निधन झालं..

१९०८ मध्ये श्री गजानन महाराज संस्थान नावाचा ट्रस्ट स्थापन करण्यात आला. ट्रस्टचे विश्वस्त म्हणून बारा विश्वस्थांची नियुक्ती करण्यात आली. यात्रा थांबू देवू नका, पैसा साचू देवू नका, निसिम्म भावनेने सेवा करा या तत्वांवर ट्रस्टचा कारभार सुरू करण्यात आला.

या संस्थानची सुत्रे पुढील काळात शिवशंकर भाऊ पाटील यांच्या हातात आली. त्या काळात संस्थानची वार्षिक उलाढाल ४५ लाख होती. भाऊंनी संस्थानमध्ये कामे करण्यास सुरवात केली. काही वर्षांमध्ये शिवशंकर भाऊंनी संस्थानची वार्षिक उलाढाल १३७ कोटींच्या घरात नेवून ठेवली.

हे सर्व करत असताना शिवशंकर भाऊंनी संस्थानच्या पैशातून कधी चहा सुद्धा घेतला नाही हे विशेष.

आलेला पैसा साचू द्यायचा नाही या विचारातून शिवशंकरभाऊंच्या माध्यमातून मंदिर परिसराचा कायापालट करण्यात आला. आज शेगाव संस्थानबद्दल सांगायच झालं तर इथे सर्वात देखणं आणि तितकच नावाजलेलं अस इंजिनियरिंग कॉलेज आहे, भक्तनिवासाची सोय कौतुकास पात्र अशी आहे आणि आनंदसागर सारखा ६५० एकर मध्ये पसरलेला परिसर आहे. शेगाव संस्थानचे भक्त निवासच्या खोल्या या पंचतारांकित हॉटलेल्सना लाजवतील अशा आहेत.

आनंदसागरची तर संपुर्ण संकल्पना शिवशंकर भाऊ यांनी उभा केली. महाराष्ट्राच्या धार्मिक स्थळांसोबत मुख्य पर्यटन स्थळ म्हणून आनंदसागरचा उल्लेख केला जातो. विदर्भाच्या सांस्कृतिक अस्मितेते मानाचा तुरा खोवण्याच काम हे शिवशंकर भाऊंचीच कमाल आहे.

देवस्थानच्या कामासोबतच ते सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असायचे विदर्भात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा शेगाव नगरपरिषदेला ७ कोटी ७७ लाख रुपये दिल्यामुळे शेगावची नळयोजना सुरू होवू शकली.

सांगली कोल्हापूर येथे झालेल्या पुरामध्ये त्यांनी संस्थानमार्फत एक कोटींची मदत केली.

आजच्या काळात सोन्या चांदीने देवाला प्रसन्न करण्याची फॅशन रुढ होत असताना शिवशंकर भाऊ पाटील यांनी समाजकार्य करण्याचा घातलेला पायंडा किती महत्वाचा होता हे समजतं. केवळ मंदिर परिसर उभा करणारेच नव्हे तर हजारों माणसं उभा करणाऱ्या शिवशंकर भाऊंना बोलभिडू कडून भावपूर्ण श्रद्धांजली.


Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке