Kolhapur Black Magic: कौलवमध्ये घरात खड्डा खणला, मांत्रिक आणले पण सरपंचाने भांड फोडलं.नरबळीची शंका?

Описание к видео Kolhapur Black Magic: कौलवमध्ये घरात खड्डा खणला, मांत्रिक आणले पण सरपंचाने भांड फोडलं.नरबळीची शंका?

#BolBhidu #KolhapurNarbali #BlackMagic

गावात अमावस्याला काहीतरी विपरीत घडणारे. कुणाचा तरी नरबळी दिला जाणारे, या चर्चेनं सगळं गाव हादरलं होतं. भर दुपारी गावात स्मशान शांतता होती. लोकं आपापल्या घरात कड्या लावून बसले होते, गावातली पोरं शाळॆत गेली नव्हती, माणसं कामाला बाहेर पडली नव्हती. हे सगळं घडत होतं, कौलव या गावात. कोल्हापूरपासून फक्त ३० किलोमीटरवर असलेलं हे गाव. जेमतेम ५ हजार लोकसंख्या असलेलं. जी काही धावपळ सुरु होती, ती एखाद्या कोपऱ्यात किंवा रिकाम्या मळ्यात पण नाही, तर गावातल्या मुख्य रस्त्यावर शरद धर्मा माने यांच्या घराजवळ. माने यांच्या घरातून कसला तरी आवाज येत होता. घराबाहेर अनोळखी लोकांच्या संशयास्पद हालचाली सुरू होत्या.

शरद मानेच्या मुलाकडून घराबाहेर पहारा दिला जात होता. घरात काय घडतंय. घरातून कसला आवाज येतोय, याची कसलीही कल्पना गावकऱ्यांना नव्हती. पण गावात दबक्या आवाजात चर्चा सुरु होती, कुणाचा तरी नरबळी जाणार, साहजिकच भीती पसरली आणि या भीतीनं सगळं गाव घाबरून गेलं. कौलवमध्ये नेमकं काय घडलं ? लोकांमध्ये भीती का पसरलेली ? शरद मानेच्या घरात गावकऱ्यांना काय दिसलं ? आणि हे प्रकरण नेमकं होतं कसलं ? त्याचीच स्टोरी पाहुयात ह्या व्हिडिओतून..

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке