Andhra Murukku Recipe | कुरकुरीत तांदूळाच्या पिठाची चकली | काटेशेव

Описание к видео Andhra Murukku Recipe | कुरकुरीत तांदूळाच्या पिठाची चकली | काटेशेव

‪@Jyoti_kitchen88‬
नमस्कार मंडळी,
मी प्रतिभा गुजर तुमचं स्वागत करत आहे.आज मी चकली | काटेशेवची रेसिपी शेअर केली आहे.
त्यासाठी लागणारे साहित्य=
तांदूळचे पिठ न भाजता -१किलो (४ग्लास)
फुटाणे पिठ -११/२ ग्लास
लाल मिरची पावडर -२ चमचा
हळद. -१चमचा
मीठ चवीनुसार
ओवा, जिरे पावडर मिक्स. -१/२वाटी
तीळ -१/२वाटी
मोहन -४पळी तेल
विधी =
तांदूळ पिठात फुटाणे पिठ, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, ओवा, जिरे पावडर,तीळ घालून ते मिश्रण चांगले एकजीव करावे व नंतर त्यात ४पळी तेल गरम करून त्यावर घालून ते मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या.एका भांड्यात १ ग्लास पाणी कडकडीत गरम करून त्यात मावेल एवढे पीठ घालून ते घोटावे.एका ताटात थोडे हे घोटलेले पीठ थोडे घालून त्यात वाळ्ळे तांदळाचे पीठ थोडे घालून ते थंड पाण्याने घट्ट तिंबुन घ्या.चकलीच्या साच्यात घालून ते गोल गोल छोटे छोटे चकली करा व गरम तेलात मिडीयम फ्लेमवर सगळे चकली एकसारखे उलटून पालटून लालसर होईपर्यंत तळा.चकली तयार झाली आहे.
धन्यवाद 🙏 🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке