मसालेदार झणझणीत भंडारी पद्धतीचा चिंबोऱ्याचा रस्सा|Crab Curry|खेकड्याच कालवण by Arpana Mhatre

Описание к видео मसालेदार झणझणीत भंडारी पद्धतीचा चिंबोऱ्याचा रस्सा|Crab Curry|खेकड्याच कालवण by Arpana Mhatre

मसालेदार झणझणीत भंडारी पद्धतीचा चिंबोऱ्याचा रस्सा|Crab Curry|खेकड्याच कालवण by Arpana Mhatre
   • पारंपरिक भंडारी मसाला/Mix Masala/Easy...  
*भंडारी पद्धतीचा चिंबोऱ्याचा रस्सा-:
साहित्य-:चार ते पाच चिंबोरी स्वच्छ साफ करून व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे तुकडे करून घ्या, त्याच्या छोट्या पायाची वाटून पेस्ट करून गाळणीने गाळुन घ्या ,एक वाटी सुके खोबरे आणि दीड कांदा चिरून गुलाबी रंगावर तळून पेस्ट करून घ्या,एक कांदा पेस्ट करून घ्या ,तीन ते चार चमचे मसाला, एक चमचा हळद, दोन तुकडे दालचिनी ,दोन ते तीन लवंगा, सात ते आठ काळीमिरी, एक चक्रीफुल, दोन तेजपत्ता, आले पेस्ट ,लसूण पेस्ट, मीठ आणि तेल
*कृती-:प्रथम जाड बुडाच्या पातेल्यात तीन ते चार चमचे तेल गरम करून घ्या,तेलावर आले लसूण पेस्ट घाला परतून घ्या ,नंतर कांद्याची पेस्ट आणि अख्खा मसाला( लवंग, काळीमिरी,दालचिनी, चक्रफुल, आणि तेजपत्ता)घालून परतून घ्या, नंतर हळद, मसाला घाला पुन्हा परतून थोडे पाणी घाला नंतर चिंबोरीचे तुकडे घाला आणि झाकण ठेवून पाच मिनिटे शिजवून घ्या पाच मिनिटानंतर चिंबोऱ्या च्या पायाचा पेस्ट घालून चांगले परता, नंतर कांदा खोबर्‍याचे दोन चमचे वाटण, मीठ घाला व पुन्हा पाच ते सात मिनिटे शिजवून घ्या आता आपला चिंबोऱ्या झणझणीत मसालेदार रस्सा तयार आहे,भात किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर गरमागरम सर्व्ह करा.

Bhandari method Chimborya gravy-:
Ingredients-: Clean four to five chimbori and cut it into pieces as per the video ,One Tablespoon masala, one teaspoon turmeric, two pieces cinnamon, two to three cloves, seven to eight black pepper, one chakriful, two bay leaves, ginger paste, garlic paste, salt and oil
Recipe: First heat three to four teaspoons of oil in a thick saucepan, add ginger garlic paste to the oil and fry, then add onion paste and whole spices (cloves, black pepper, cinnamon, chakra flower, and bay leaves), then turmeric, Add masala again, add some water, then add chimbori pieces and cook for 5 minutes with lid on. The gravy is ready, serve hot with rice or rice bread.

Комментарии

Информация по комментариям в разработке