दर १४ जानेवारीला Panipat च्या युद्धाची आठवण ठेवणारे Rod Maratha Haryana मध्ये कसे पोहोचले ?

Описание к видео दर १४ जानेवारीला Panipat च्या युद्धाची आठवण ठेवणारे Rod Maratha Haryana मध्ये कसे पोहोचले ?

#BolBhidu #Panipat #rodmaratha

समजा तुम्ही हरियाणात गेलात आणि तुम्हाला रामराम करुन पुढं जाणाऱ्या, आपुलकीनं चौकशी करणाऱ्या आणि अगदी घरचं माणूस समजून जेऊ घालणाऱ्या लोकांची आडनावं आहेत, भोसले, पाटील, सावंत, शेलार, चोपडे. आता आडनावं तर मराठी, पण त्यांच्या भाषेत मोजके मराठी शब्द सोडले तर बाकी लहेजा हरियाणवी. सुरुवातीला नुसतं समजा म्हणलं असलो, तरी हे प्रत्यक्षात घडू शकतंय आणि हरियाणात तुमचा मराठमोळा पाहुणचार करणारी ही माणसं असतील, रोड मराठे. टोकियो ऑलिंपिक्समध्ये नीरज चोप्रानं भारतासाठी भालाफेकमध्ये गोल्ड मेडल जिंकलं, तेव्हाही रोड मराठे हा विषय चर्चेत आलेला.

२०१६ मध्ये स्वतः नीरज चोप्रा 'मला रोड मराठा असल्याचा अभिमान आहे' असं म्हणल्याच्या बातम्याही तेव्हा आल्या होत्या. त्यावेळी रोड मराठ्यांचा विषय तेवढ्यापुरता चर्चेत आला आणि नंतर त्या चर्चा थांबल्याही. पण रोड मराठ्यांची हमखास आठवण यावी असा एक दिवस दरवर्षी येतो, १४ जानेवारी. अर्थात पानिपतच्या युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या योध्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा शौर्य दिन. रोड मराठे कोण आहेत ? त्यांचा इतिहास काय आहे ? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке